spot_img
अहमदनगरकृषिनाथ कारखान्याने ऊस उत्पादकांना न्याय दिला; पद्मश्री पवार

कृषिनाथ कारखान्याने ऊस उत्पादकांना न्याय दिला; पद्मश्री पवार

spot_img

खा. नीलेश लंके, पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन आणि गव्हाणपूजन यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. पांडुरंग राऊत, जनता सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप, राज्य सहकारी बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक अशोक माने, कल्याण जनता सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक अनंत कुलकण, कॉसमॉस बँकेच्या सरव्यवस्थापक सौ. अपेक्षिता उदय ठिपसे, माळकूपचे सरपंच संजय काळे, उपसरपंच राहुल घंगाळे, ढवळपुरीच्या सरपंच सौ. नंदाताई भागाजी गावडे, कृषिनाथचे कार्यकारी संचालक व अध्यक्ष महेश करपे, कार्याध्यक्ष रवींद्र भुजबळ, उपाध्यक्ष अनिल मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश मते, कारखान्याचे प्रवर्तक सुनील शिंदे, आकाश भुजबळ, संचालक सर्वश्री सोमेश जेरथ, नरेश करपे, डॉ. सौ. वंदना पोपट मते, दीपक गोरे, मानव आहलुवालिया, मल्हारी चांधेरे, भारत टिळेकर, लहू जमदाडे, गणेश टिळेकर, सौ. कविता राजेश बनकर, अपूर्व अशोक पलांडे, जयदीप दोशी, भाऊसाहेब आव्हाळे, सचिन पारखे, बाळासाहेब चांधेरे, सर्जेराव खेडकर, नितीन गडदे आदी उपस्थित होते.

पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर सारख्या दुष्काळी तालुक्यात साखर कारखाना उभारण्याचे मोठे धाडस कृषीनाथच्या संचालकांनी दाखवले आणि त्यांच्या या धाडसाला ऊस उत्पादकांनी प्रतिसाद दिला यातच या कारखान्याचे यश आहे. खासगी साखर कारखाना असूनही हा कारखाना पारनेरसह राहुरी, नगर, नेवासा, श्रीगोंदा, शिरुर, संगमनेर या तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्याच वर्षात आपला कारखाना वाटू लागला. कृषीनाथच्या संचालकांनी विश्वस्ताच्या भावनेतून केलेल्या कामाची हीच पोहोच पावती असून शेतकऱ्यांच्या विश्वासाला या संचालकांकडून तडा जाणार नाही असा विश्वास पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केला.

कृषीनाथ ग्रीन एनज लि. माळकुप (ढवळपुरी फाटा) ता. पारनेर येथील साखर कारखान्याचा बॉयलर अग्रीप्रदीपन आणि गव्हाण पुजन कार्यक्रम नगरचे खासदार नीलेश लंके आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते नुकताच पार पडला. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. पांडुरंग राऊत हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जनता सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदिश कश्यप, राज्य सहकारी बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक अशोक माने, कल्याण जनता सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक अनंत कुलकण, कॉसमॉस बँकेच्या सरव्यवस्थापक सौ. अपेक्षिता उदय ठिपसे, माळकुपचे सरपंच संजय काळे, उपसरपंच राहुल घंगाळे, ढवळपुरीचे सरपंच सौ. नंदाताई भागाजी गावडे, कृषीनाथचे कार्यकारी संचालक व अध्यक्ष महेश करपे, कार्याध्यक्ष रविंद्र भुजबळ, उपाध्यक्ष अनिल मोहिते मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश मते यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक, परिसरातील ऊस उत्पादक, सरपंच, सेवा सोसायट्यांचे चेअरमन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की, माळकुप- ढवळपुरी परिसरातील माळरानावर साखर कारखाना उभा राहत असताना तो यशस्वीपणे चालेल किंवा नाही याबाबत अनेकांना शंका होत्या. मात्र, कृषीनाथच्या संचालक मंडळाने प्रतिकुल परिस्थितीवर मात करत हा खासगी कारखाना चालवून दाखवला. मागील वर्षात चाचणी गळीत हंगाम यशस्वी केला. सहवीजनिर्मिती आणि इथेनॉल निर्मितीचे मोठे धाडसी पाऊल संचालकांनी उचलले आणि त्यात त्यांना यश देखील आले. टीमवर्क म्हणून या कारखान्याचे सर्व संचालक विश्वस्ताच्या भावनेतून काम करत असून त्याला ऊस उत्पादकांनी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद असल्याचेही पोपटराव पवार यांनी नमूद केले. कारखान्याचे कार्यकारी संचालक महेश करपे यांनी कारखाना उभारणीपासून ते आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. ऊस उत्पादकांना न्याय देण्याच्या भूमिकेतून कारखाना चालवताना काळजी घेतली जात असल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले.

आमदार अन्‌‍ खासदारकीचा नीलेश लंके यांचा असाही योगायोग!
कृषीनाथ साखर कारखान्याचा पहिला चाचणी गळीत हंगाम सुरू करताना गव्हाणीत मोळी टाकण्यासाठी आलो त्यावेळी मी आमदार होतो आणि आता दुसऱ्यांदा गव्हाण पुजन करताना आलो असताना खासदार म्हणून येण्याचे भाग्य मिळाल्याबद्दल खासदार नीलेश लंके यांनी समाधान व्यक्त केले. राज्यातील साखर कारखानदारांच्या जोडीत आता माझा पारनेर तालुका देखील आला असल्याचे आपल्याला अभिमान असून कारखान्याचे संचालक मंडळ ऊस उत्पादकांच्या विश्वासास पात्र ठरेल असे काम करत असल्याबद्दलही खा. नीलेश लंके यांनी समाधान व्यक्त केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

उमेदवार ठरविण्यात खा. नीलेश लंकेच किंगमेकर!

सारिपाट / शिवाजी शिर्के:- लोकसभा निवडणुकीत जायंट किलर ठरलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार नीलेश...

मोठी बातमी! राजकीय घडामोडींना वेग; एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे यांच्या सोबत गुप्त बैठक

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागली असून राजकारणात घडामोडींना वेग आला...

ब्रेकिंग! नगरच्या राजकारणात ट्विस्ट!; सत्यजित तांबे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकिय चर्चांना उधाण…

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागली आहे. भाजपने ९९ उमेदवारांची घोषणा...

अल्पवयीन मुलावर धारदार शस्राने सपासप वार!; बारातोंटी कारंजा जवळ नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- तिघांनी अल्पवयीन मुलावर (वय 17) धारदार वस्तूने वार करून त्याला...