spot_img
अहमदनगरAhmednagar:नगरची ’ती’ कोयता गँग ताब्यात!! तोफखाना पोलिसांची कारवाई

Ahmednagar:नगरची ’ती’ कोयता गँग ताब्यात!! तोफखाना पोलिसांची कारवाई

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
धारदार शस्त्राचा धाक दाखवून सावेडी आणि परिसरात दहशत माजविणारी कोयता गँगला तोफखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या आहे.

अमोल गोपीनाथ गायकवाड (वय २६ रा. गऊखेल ता. आष्टी जि. बीड, हल्ली रा. तपोवनरस्ता, सावेडी), रोहीत रमेश औटे (वय २० रा. पिंपरखेड ता. आष्टी जि. बीड, हल्ली रा. पोखर्डी ता. नगर), विकास सदाशिव दिवटे (रा. गाडेकर चौक, निर्मलनगर, सावेडी) अशी गँगमधील पकडलेल्या तिघांची नावे आहेत.

तोफखाना हद्दीत मकरसंक्रांतीच्या अनुषंगाने गस्त घालीत असताना सपकाळ चौकात काही इसम दारूच्या नशेत संशयीतरित्या शस्त्रे घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पथकाने सदर चौकात जाऊन पाहणी केली असता त्यांना तीन इसम संशयीतरित्या फिरताना मिळून आले.

पंचासमक्ष त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून दोन कोयते व दुचाकी असा २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...