अहमदनगर । नगर सहयाद्री
गोवंशीय जनावरांची वाहतुक करणाऱ्याला कोतवाली पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याकडून १० लाख ३९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ३९ जिवंत गोवंशीय वासरांची सुटका करण्यात आली आहे. मोसिम मुस्ताक कुरेशी ( वय- ४० वर्ष रा. बेपारी मोहल्ला झेंडीगेट, अहमदनगर ) असे त्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी: पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना केडगाव बायपास येथे आयशर टेंम्पोने गोवंशीय जनावरांची वाहतुक करत असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली. मिळालेल्या माहिती प्रमाणे पो.नि प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना कारवाई करण्याबाबत आदेशित केले. पथकाने सापळा रचत आयशर टेंम्पो क्रमांक ( एम. एच ०४ जे यू २१०१ ) येताच त्यास थांबवुन टेंम्पोची पाहणी केली असता, त्याचे टैम्पोमध्ये गोवंशीय जातीचे काळे पांढरे रंगाचे वासरे दिसुन आले. याबाबत चौकशी केली असता त्याने सदरची गोवंशीय ही मी समीर शेख (रा कसाई मोहल्ला, सुपा, अहमदनगर ) यांचे मालकीचे असुन ते झेंडीगेट येथे कत्तलीकरीता घेऊन जात असल्याचे सांगितले.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, गुन्हे शोध पथकाचे सपोनि योगीता कोकाटे, पोहेकॉ शाहीद शेख, पाहेकॉ ए पी इनामदार, पोना अविनाश वाकचौरे, मपोना संगिता बडे, पोकों सत्यजित शिंदे, पोकों तानाजी पवार, पोकों सुरज कदम, पोकों अतुल काजळे, पोकॉ दिपक रोहोकले, पोकॉ सचिन लोळगे, पोकों ढाकणे यांच्या पथकाने केली आहे.