spot_img
अहमदनगरकोतवाली पोलिसांचा छापा; पत्र्याच्या शेडमध्ये..

कोतवाली पोलिसांचा छापा; पत्र्याच्या शेडमध्ये..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
हमालवाडा, कुरेशी मस्जिद शेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये कोतवाली पोलिसांनी छापा टाकून एक लाख 40 हजार रूपये किंमतीची 10 लहान- मोठ्या जनावरांची सुटका केली. मंगळवारी (15 ऑक्टोबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.

या प्रकरणी पोलीस अंमलदार सुजय हिवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तौसीफ कुरेशी (पूर्ण नाव नाही, रा. कुरेशी मस्जिद शेजारी, हमालवाडा, अहिल्यानगर) याच्याविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हमालवाडा, कुरेशी मस्जिद शेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये काही गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवली असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती.

पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पंचासमक्ष सदर ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश पथकाला दिले. पथकाने मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला असता 80 हजाराची चार मोठी जनावरे, 60 हजाराची लहान जनावरे अशी एकुण 10 जनावरांची पोलिसांनी सुटका केली.

सदरची जनावरे तौसीफ कुरेशी याने कत्तलीसाठी आणली असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार एस. एस. डाके करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मान्सूनची पुन्हा गर्जना; ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Monsoon:वेळेआधीच दाखल मान्सूनने यंत्रणांची पोलखोल केली आणि मान्सून पुन्हा गायब झाला.. मात्र 3...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या लोकांनी सावध रहा, तुमची प्रगती त्यांना सहन होत नाही

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. आजारावर जालीम लसीकरण लाभदायी...

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...