पारनेर | नगर सह्याद्री
पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबा देवस्थान गडावर देवस्थान ट्रस्टकडून वार्षिक यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. गुरूवार (दि.२५ जानेवारी) पासून तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष शालिनी घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे, राजेंद्र चौधरी यांनी दिली.
गुरुवारी पहाटे ४ वा. खंडोबा देवाला मंगलस्नान, पूजा, चांदीचे सिंहासन व चांदीच्या उत्सव मुर्तीचे अनावरण होईल. सकाळी ६ वाजता आ. निलेश लंके, राणी लंके, तहसिलदार गायत्री सौंदाने यांच्या हस्ते अभिषेक महापूजा, महाआरती होईल. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरे खुले होईल.
सायंकाळी ४ वाजता कोरठण खंडोबा पालखी गावात मुक्कामी जाईल. दुसर्या दिवशी शुक्रवारी सकाळपासून देवदर्शन सुरु होईल, खंडोबा पालखी मंदिराकडे येईल. दहा वाजता बैलगाडा घाटाचे पूजन होईल. संगमनेर तालुयातील सावरगाव घुले येथूनआलेल्या खंडोबा मानाची पालखीची मिरवणूक व देवदर्शन कार्यक्रम मंदिराजवळ होईल.
सायंकाळी छबिना मिरवणूक असेल. शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस असेल. सकाळी ८ वाजता खंडोबा चांदिची पालखी आणि अळकुटी, बेल्हे, कांदळी वडगांव ,माळवाडी, सावरगांव घुले, कासारे, कळस येथुन आलेल्या पालख्यांची मिरवणूक निघेल. दुपारी १२ वाजता मंदिराच्या पायर्यांवर येऊन या मिरवणुकीची सांगता होईल. दुपारी १ वाजता बेल्हा व ब्राह्मणवाडा येथून आलेल्या मानाच्या काठ्यांची मिरवणूक होईल अशी माहिती विश्वस्त अॅड.पांडुरंग गायकवाड, राजेंद्र चौधरी, खजिनदार तुकाराम जगताप, जालिंदर खोसे, कमलेश घुले, अशोक घुले, चंद्रभान ठुबे, सुवर्णा घाडगे, सुरेश फापाळे, रामदास मुळे, महादेव पुंडे, धोंडीभाऊ जगताप, दिलीप घुले आदींनी दिली.