निघोज | नगर सह्याद्री
निघोज येथे वेताळबाबा स्टेडियमवर बुधवार दि.१० पासून खासदार चषक क्रिकेट स्पर्धा मोठ्या थाटामाटात संपन्न होत असून या स्पर्धा ५ दिवस चालणार असल्याची माहिती संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ पाटील यांनी दिली आहे.
गेली अनेक वर्षांपासून संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन संचलित संदीप पाटील प्रिमियर लिग माध्यमातून या क्रिकेट स्पर्धा होत असतात मात्र कोरोना काळामुळे या स्पर्धा घेण्यासाठी खंड पडला होता. २०२४ या वर्षांपासून या स्पर्धा पुन्हा नव्या जोमाने सुरू होत असून जिल्ह्यातील पहिलीच खासदार चषक क्रिकेट स्पर्धा म्हणून याकडे पाहिले जाते.
पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक एक लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७१ हजार रुपये तृतीय क्रमांक ५१ हजार रुपये, चतुर्थ क्रमांक ३१ हजार रुपये तसेच प्रथम येणार्या संघास मोटरसायकल तसेच मॅन ऑफ दी सिरीज या खेळाडूस मोटरसायकल अशाप्रकारे लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असून या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी क्रिकेट प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन व निघोज ग्रामस्थ यांनी केले आहे.