spot_img
अहमदनगरकान्हूर पठार पतसंस्था : मार्च अखेर ताळेबंद जाहीर करण्याची परंपरा कायम, यंदा...

कान्हूर पठार पतसंस्था : मार्च अखेर ताळेबंद जाहीर करण्याची परंपरा कायम, यंदा झाला ‘इतका’ नफा

spot_img

कान्हुर पठार पतसंस्थेला 14 कोटी 70 लाख रुपयांचा नफा

पारनेर / नगर सह्याद्री –

राज्याच्या सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व स्व. दिलीपराव ठूबे यांनी घालून दिलेल्या आर्थिक शिस्तीवर चालत असलेल्या पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार पतसंस्थेने आर्थिक वर्ष संपताना म्हणजेच 31 मार्च अखेर ताळेबंद जाहीर करण्याची परंपरा याही वर्षी कायम ठेवली आहे. संस्थेने 31 मार्च रोजी संध्याकाळी आर्थिक पत्रक जाहीर केले असून संस्थेला या आर्थिक वर्षात 14 कोटी 70 लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. तरतुदी वजा जाता निवळ नफा 3 कोटी 75लाख रुपयांचा झाला असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुशीला ठुबे व कार्यकारी संचालिका नमिता ठुबे यांनी दिली.

31 मार्च 2024 चे आर्थिक वर्ष संपल्यानंतर त्याच संध्याकाळी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात कार्यकारी संचालिका नमिता ठुबे यांनी याबद्दलची माहिती दिली.
संस्थेचे व्हाइस चेअरमन पी . के. ठूबे म्हणाले की, मार्च अखेर संस्थेकडे 416 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.
संस्थेने विविध बँकांतील गुंतवणूक 155 कोटी रुपयांची केली आहे. संस्थेचे तरलतेचे प्रमाण योग्य पद्धतीने राखले आहे. तरलते पेक्षा अधिक गुंतवणूक करण्यात आली असून संस्थेची आर्थिक स्थिती विषयी माहिती देताना कार्यकारी संचालिका नमिता ठूबे यांनी सांगितले की, आर्थिक बाबींचा विचार करता संस्थेच्या सभासद ठेवीदार कर्जदार यांनी संस्थेवर मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवला आहे. संस्थेकडे 68 कोटी रुपयांचा स्वनिधी आहे. संस्थेच्या विविध शाखांमधून 388 कोटी रुपयांची कर्ज वाटप करण्यात आले आहे. संस्थेने ग्राहकाभिमुख सेवा देताना बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून कोर बँकिंग सेवा उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार संस्थेने ग्राहकांना आरटीजीएस एसएमएस सेवा सुविधा सर्व शाखांमधून ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबत लाईट बिल भरणा मोबाईल व डिश टीव्ही रिचार्ज या सेवा उपलब्ध करून दिले आहेत. ठेवीदारांच्या सुरक्षिततेला अधिक महत्त्व देत संस्थेने संस्थेचे स्वतःच्या मालकीचे डाटा सेंटर सुरू केले आहे.

संस्थेच्या 13 शाखांचे इमारती स्वमलकीचे आहेत त्यांची बाजार भावाप्रमाणे किम्मत आंदाजे 50कोटीहून अधिक आहे. संस्थेचे खेळते भांडवल 756 कोटी रुपयांचे आहे. अशा प्रकारे संस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय सक्षम आहे त्यामुळे संस्थेची आर्थिक व्यवहार दिवसेंदिवस वाढत असून संस्था प्रगतीपथावर आहे. ठेवीदारांचा विश्वास ही संस्थेची जमेची बाजू असल्याचे वेळोवेळी अधोरेखित झाले आहे.
संस्थेला सातत्याने ऑडिट वर्ग “अ” भेटला आहे, तसेच फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट कोऑपरेटिव सोसायटी यांच्याकडून वेळोवेळी ” उत्कृष्ट संस्था व व्यवस्थापन ” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

संस्थेचे आर्थिक पत्रक सादर करतेवेळी संस्थेच्या अध्यक्षा सुशीला ठुबे यांच्यासह उपाध्यक्ष पि. के ठुबे, कार्यकारी संचालिका नमिता ठुबे, संस्थेचे संचालक सुहास शेळके, भास्कर ठुबे, मधुकर साळवे, संपत खरमाळे, भोमा ठुबे, राजेंद्र रोकडे, भगवान वाळुंज, गौराम गाडगे, पो. मा. झावरे, दादाभाऊ नवले, मंगेश गागरे आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल…

मुंबई / नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे...

मोठी बातमी; ब्रेक फेल झाल्याने बस थेट बसस्थानकातच घुसली

प्रवासी झाले जखमी; मोठा अनर्थ टळला पारनेर / नगर सह्याद्री पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एसटी...

एकच भाऊ देवा भाऊ; गटनेतेपदी फडणवीसांची घोषणा होताच नगरमध्ये जल्लोष

देवेंद्र फडणवीस हे डायनामिक, सक्षम, प्रगतीशील नेतृत्व : अॅड. अभय आगरकर अहिल्यानगर / नगर सह्याद्री...