spot_img
अहमदनगर'शहरातील महाघोटाळाचा ९३० कागदाचा पुरावा काळेंनी अँटी करप्शनकडे नोंदविला'; कोणी कोणी याचा...

‘शहरातील महाघोटाळाचा ९३० कागदाचा पुरावा काळेंनी अँटी करप्शनकडे नोंदविला’; कोणी कोणी याचा मलिदा लाटला?, वाचा सविस्तर..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
मागील सात ते आठ वर्षांमध्ये कोट्यावधी रुपये रस्त्यांच्या कामांसाठी महानगरपालिकेने खर्च केले. तरी देखील आजही शहर खड्ड्यां मध्येच आहे. मग जनतेचे हे कोट्यावधी रुपये गेले कुठे ? कोणी कोणी याचा मलिदा लाटला ? कोणी नगरकरांना खड्ड्यामध्ये घातले? अशा अनेक प्रश्नांना आता वाचा फुटू लागली आहे. बहुचर्चित १५० कोटी रुपयांच्या शहर मनपाच्या रस्ते घोटाळ्या संदर्भात तक्रारदार शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचा अँटी करप्शन कार्यालयाने जबाब नोंदविला आहे. सुमारे दोन तास ही प्रक्रिया सुरू होती. जबाबाच्या तपशिलाबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. काळे यांनी तब्बल ९३० कागदपत्रांचे पुरावे यावेळी अँटी करप्शन ब्यूरोचे पोलीस उपाधीक्षक अजित त्रिपूटे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. हा शहर मनपातील आजवरचा सर्वात मोठा महाघोटाळा असल्याचा दावा काळे यांनी जबाब नोंदवल्यानंतर माध्यमांशी बोलताना केला आहे.

बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत काळे यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया टीव्ही सेंटर परिसरातील अँटी करप्शन कार्यालयात सुरू होती. काळे दुपारनंतर पुराव्यांसह कार्यालयात दाखल होताच त्याची बातमी शहरभर पसरली. नेमका काय जबाब नोंदविला जातो याबाबत कुजबुज सुरू झाली. माहिती अधिकारात मागील सुमारे दीड वर्षांपासून पाठपुरावा करत काळे यांनी अनेक पुरावे मिळविले आहेत. त्यातील काही पुरावे त्यांनी जबाब नोंदविताना सादर केले आहेत.

याबाबत माहिती देताना किरण काळे म्हणाले की, जबाबाचा सविस्तर तपशील सार्वजनिक करणे योग्य नाही. मात्र काही गोष्टी जगजाहीर आहेत. त्याबद्दल बोलता येऊ शकते. माझ्याकडे याबाबत अजून महत्त्वपूर्ण पुरावे आहेत. योग्य वेळी ते देखील मी तपास यंत्रणेला सादर करणार आहे. दि. ८ मे २०२३ रोजी मी या गंभीर भ्रष्टाचाराबाबत महापालिकेकडे तक्रार केली होती. त्यानंतर १५ मे रोजी पहिले व २२ मे २०२३ रोजी दुसरे स्मरण पत्र दिले. त्यामध्ये मनपा तत्कालीन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना रस्त्यांच्या कामांमध्ये निकृष्ट कामे करून बनावट टेस्ट रिपोर्ट व थर्ड पार्टी बनावट रिपोर्ट जोडून घोटाळा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. अन्यथा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी १ जून २०२३ रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालना समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

काळे पुढे म्हणाले, आत्मदहन करण्यापूर्वीच आदल्या रात्री पोलिसांनी मला व माझ्या काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांना सावेडीत पक्षाची बैठक सुरू असताना ताब्यात घेत तोफखाना पोलीस स्टेशन येथे नेले. त्यावेळी मनपा उपायुक्त व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या मान्यतेने ठोस कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन पाळले गेले नाही. हे सर्वश्रुत आहे की ज्या आयुक्तांनी भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तेच आयुक्त सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये निलंबित आहेत. दुःखद बाब म्हणजे आयुक्त पंकज जावळे यांना या शहरामध्ये भ्रष्टाचार करण्यासाठीच लोकप्रतिनिधींनी शिफारस करून आणले होते की काय याबद्दलचा संशय आता गडद होत चालला आहे.

 ७७६ कामे अँटी करप्शनच्या रडावर
महापालिका यंत्रणा, ठेकेदार यांनी राजकीय पुढाऱ्यांच्या वरदहस्थातून सुमारे ७७६ कामांमध्ये निकृष्ट कामे करत भ्रष्टाचार केला गेला असल्याचा जबाब किरण काळे यांनी नोंदवला आहे. त्यामुळे आता सन २०१६ ते सन २०२० या सुमारे चार वर्षांच्या कार्यकाळातील ती ७७६ कामे अँटीकरप्शनच्या रडारवर आली आहेत. एवढेच नव्हे तर सन २०२० ते २०२३ या कार्यकाळातील कामां बद्दल देखील काळे यांनी तक्रार केली आहे. गुन्ह्याची व्याप्ती यामुळे मोठी असण्याची दाट शक्यता आहे.

काळे यांचे नागरिकांकडून स्वागत
किरण काळे यांनी नगर शहरातील नागरिकांची जीवनवाहिनी असणाऱ्या रस्त्यांच्या प्रश्नावर घेतलेल्या आक्रमक भूमिका आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे उघडकीस आणलेल्या महाघोटाळ्या मुळे नगरकरांमध्ये पुढील काळात रस्त्यांच्या कामांमध्ये भ्रष्टाचाराला पाय बंद होईल अशी आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे काळे यांच्या कामाचे नगरकरांकडून स्वागत व कौतुक होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘स्थानिक स्वराज्य’ संस्थांच्या निवडणुकीबाबत मंत्री विखे पाटलांचे महत्वाचे स्टेटमेंट; लवकरच..

स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लवकरच; प्रदेशाध्यक्ष आ.चव्हाणांना दिल्या शुभेच्छा   शिर्डी । नगर सहयाद्री  पंतप्रधान नरेंद्र मोदी...

मुहूर्त ठरला; शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ‘या’ तारखेला ‘सर्वोच्च’ सुनावणी

मुंबई । नगर सहयाद्री:- शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' या पारंपरिक निवडणूक चिन्हाच्या मालकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गेल्या दोन...

विधानसभेत गरजला पारनेरकरांचा आवाज! आ. दाते यांनी मांडला ‘तो’ प्रश्न; वेधले शासनाचे लक्ष

पारनेर । नगर सहयाद्री :- पारनेर-नगर मतदारसंघातील सुपा पासून खडकी, खंडाळ्यासह जिल्ह्यातील विविध भागात दि...

श्रीराम चौकातील मावा बनवणाऱ्या कारखान्यांवर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री नगर शहरात सुगंधी तंबाखू आणि मावा तयार करणाऱ्या अवैध कारखान्यांवर अहिल्यानगर...