मुंबई । नगर सहयाद्री:-
मराठी चित्रपटसृष्टीत अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांचे वैयक्तिक आयुष्य त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा अधिक चर्चेत राहिले आहे. कधी प्रेम प्रकरण कधी लग्न तर कधी घटस्फोट या अभिनेत्री कायमच प्रकाशझोतात राहिल्या. अशीच एक अभिनेत्री जिने प्रेमविवाह केला खरा, पण लग्नाच्या वर्षभरातच घटस्फोटाचा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला. ही अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यामुळे घराघरात पोहोचलेल्या मानसीने एका मुलाखतीत आपल्या घटस्फोटाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.
मानसी नाईकने हरियाणाचा बॉक्सर प्रदीप खरेरासोबत मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. मात्र, लग्नाच्या अवघ्या वर्षभरातच त्यांच्या नात्याला तडा गेला. मानसीने घटस्फोट घेण्याचा निर्णय का घेतला, याबद्दल तिने एका मुलाखतीत धक्कादायक खुलासे केले आहेत. मला नेहमी वाटायचं की लग्न करून सुखाचा संसार थाटावा. एक हक्काची व्यक्ती, आपले कुटुंब असावे. पण लग्नानंतर माझा भ्रमनिरास झाला,असे मानसीने सांगितले.
पुढे ती म्हणाली, जे मला लग्नाआधी सांगितले गेले, ते लग्नानंतर अजिबात खरे नव्हते. जे काही सुरु होते ते फक्त आणि फक्त सोशल मीडियावर रिल्स आणि मीडिया पब्लिसिटीसाठी होते. माझा फक्त वापर केला गेला. त्यांच्या युट्युब चॅनेलवर महाराष्ट्रीयन व्हिवर्स वाढवण्यासाठी माझा वापर करण्यात आला. मानसीने आपल्या सासरच्यांवरही गंभीर आरोप केले आहेत. “मी सून असूनही त्यांच्या मुलाला, मुलीला, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला अगदी आई, वडील, भाऊ बनून सांभाळले, आर्थिक मदत केली, पण तरीही माझी फसवणूक झाली.