spot_img
आर्थिकJob : पुणे महानगरपालिकेत भरती, परीक्षा नाही थेट मुलाखतीमधूनच निवड

Job : पुणे महानगरपालिकेत भरती, परीक्षा नाही थेट मुलाखतीमधूनच निवड

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी भरतीची मोठी संधी आहे. थेट पुणे महानगरपालिकेत काही जागांवर भरती होणार आहे. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर या संधीचा फायदा घ्या. यासाठी कसलीच परीक्षा नसणार आहे.

यासाठी केवळ मुलाखत असेल. थेट मुलाखतीमधून निवड होणार आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

नोकरीचे ठिकाण हे पुणेच असेल. ही भरती प्रक्रिया पुणे महानगरपालिकेकडून राबवली जातेय. ही पदे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलसाठी भरली जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून विविध पदे भरली जातील. ही भरती प्रक्रिया एकून 18 पदांसाठी होत आहे. यामध्ये प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर ही पदे भरती जातील.

या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट असून एमएस, एमडी, डीएनबी उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हे करू शकतील. उमेदवारास 16 आणि 23 जानेवारी रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहवे लागेल. मुलाखतीसाठी पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय रुग्णालय, पुणे येथे उपस्थित राहवे लागले. मुलाखतीला येताना उमेदवारांना काही कागदपत्रे आपल्यासोबत आणावी लागतील. असोसिएट प्रोफेसर एकून पदे 11, प्रोफेसर एकून पदे 7 याप्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडेल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...