spot_img
लाईफस्टाईलजिल्हा आरोग्य विभागात नोकरीची संधी ! परीक्षा नाही थेट निवड

जिल्हा आरोग्य विभागात नोकरीची संधी ! परीक्षा नाही थेट निवड

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. तुम्हाला आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी आली आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे.

ही भरती प्रक्रिया जिल्हा प्रशासन, परभणी यांच्याकडून राबवली जात असून इच्छुकांसाठी नोकरीची संधी असणार आहे.
एमबीबीएस आणि पी.जी आणि पदवीधर उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येईल. यासाठी परीक्षा नसेल तर थेट मुलाखत असेल. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे जास्तीत जास्त वय हे 58 असावे.

या भरती प्रक्रियेसाठी 28 डिसेंबर 2023 ला मुलाखत घेतली जाणार आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे सकाळी दहा वाजता उपस्थित राहवे लागेल. उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे.

नोकरीचे ठिकाण हे परभणी असणार आहे. तसेच मुलाखतीला येताना उमेदवारांना आपली महत्वाची कागदपत्रे देखील आणावी लागणार आहेत. मुलाखतीला जाण्याच्या अगोदर उमेदवारांनी जाहिरात ही व्यवस्थितपणे वाचावी. तुमचे जर शिक्षण वैद्यकीय विषयात झाले असेल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर! महत्वाचे कारण आले समोर, वाचा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था -  मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

आधी पाप केलं, आता सल्ले देऊ नका!, निवृत्ती घ्या!; शरद पवार यांच्या टीकेला मंत्री विखे पाटलांचे प्रतिउत्तर

नाशिक । नगर सहयाद्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने नाशिक येथे भव्य शेतकरी...

बाजारात पोहचण्याआधीच संकट; पिकअपच्या अपघाताने हादरले ‘अहिल्यानगर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील आठवडे बाजारासाठी जात असताना सोमवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेतीन...

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना खुशखबर! सरकारचा मोठा निर्णय?, समोर आली अपडेट

मुंबई ।नगर सहयाद्री:- भारत हा कृषीप्रधान देश असून कोट्यवधी शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत....