spot_img
आर्थिकJob : युको बँकेत नोकरीची संधी, कसलीही परीक्षा नाही, पहा सविस्तर..

Job : युको बँकेत नोकरीची संधी, कसलीही परीक्षा नाही, पहा सविस्तर..

spot_img

नगर सह्याद्री टीम : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. युको बँकेमध्ये (UCO Bank)  स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती निघाली आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. त्यामुळे अनेकांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

तब्बल १२७ पदे या बँकेत भरली जाणार आहेत. ही पदे थेट मुलाखतीद्वारे भरली जाणार आहे. बँकेमध्ये नोकरी करण्याची ही सुवर्णसंधीच तुमच्याकडे असणार आहे. इच्छुकांनी उशीर अजिबातच न करता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया फक्त ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहे. यामुळे कोणत्याही परीक्षेची तयारी उमेदवारांना करण्याची गरज नाही.

27 डिसेंबर 2023 पर्यंत मुदत
ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज संबंधीत पत्त्यावर पाठवावे लागणार आहेत. अर्जासोबत उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर काही कागदपत्रे पाठवणे देखील आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 800 रूपये फिस असून काही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सूट देण्यात आली आहे.

अर्ज केलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. शैक्षणिक योग्यतेनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर उमेदवाराच्या निवड प्रक्रियेबद्दलची पुढची प्रक्रिया ही केली जाईल. या भरती प्रक्रियेचा अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना ucobank.com या साईटवर जावे लागेल. तिथेच उमेदवारांना भरती संदर्भातील सर्व माहितीही मिळेल. भरती प्रक्रियेसाठी लागणारा अर्जही तेथेच मिळणार आहे.

या पत्त्यावर पाठवा अर्ज
वेबसाइटवरून डाऊनलोड केलेला अर्ज भरून घ्या. हा अर्ज महाव्यवस्थापक, युको बँक, मुख्य कार्यालय, चौथा मजला, एच.आर. विभाग, 10, बीटीएम सारनी, ​​कोलकाता, पश्चिम बंगाल – 700 001 या पत्त्यावर पाठवावा लागणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! रस्त्यावर कचरा टाकणे आता पडणार महागात

मनपा दंडात्मक कारवाई करेल ः आमदार संग्राम जगताप | पाईपलाईन रोड परिसरामध्ये राबवले स्वच्छता...

जेवणाचे बिल मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाण, नगरमध्ये घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मागील जेवणाचे बिल मागितल्याचा रागातून एका ग्राहकाने हॉटेल चालकावर लोखंडी रॉडने...

अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; कसे आहे नियोजन, वाचा सविस्तर

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना...

२२ कोटींच्या फायद्याचे आमिष दाखवून प्राध्यापकाला ३ कोटी ३ लाखांचा गंडा

तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल अहिल्यानगर | नगर सह्याद्री भाग बाजारामध्ये भरघोस परताव्याचे आमिष...