spot_img
ब्रेकिंगPolitics News: जितेंद्र आव्हाड यांचा पुन्हा गौप्यस्फोट!! अजितदादांच्या दहशतीचा..

Politics News: जितेंद्र आव्हाड यांचा पुन्हा गौप्यस्फोट!! अजितदादांच्या दहशतीचा..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
भाजपसोबत जाण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांनी मान्य करून जे सह्यांचे पत्र तयार केले होते, त्यावेळी मी अजित पवार यांच्या दहशतीचा बळी ठरलो, असा गौप्यस्फोट आता आ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली त्यावेळी अजित पवार गटाकडून एक आरोप केला गेला होता. त्यात अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी असे म्हटले होते की एकनाथ शिंदे यांनी बंड केले त्यावेळीच राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपासह जायचे मान्य केले होते. आमदारांच्या सह्यांचे पत्र तयार होते. आता ते पत्र कसे तयार झाले? त्यावेळी नेमके काय झाले? याबाबत आव्हाड यांनी गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणतात, शरद पवार यांना एकटे टाकून भाजपसह जायचे असे ठरले होते. तसेच मी त्यावेळी अजित पवार यांच्या दहशतीचा बळी ठरलो.

एकनाथ शिंदे फुटल्याच्या बातम्या बाहेर आल्या. आमच्यातले काहीजण आधीच अस्वस्थ होते, सत्तेत जायचे आहे हे सांगायचे. दोन चार लोक असे होते की जे रोज शरद पवार यांच्याकडे जायचे आणि आपण भाजपासह जाऊ, असे म्हणायचे. एक वेळ अशी आली की काही लोक म्हणू लागले शरद पवार यांना एकटे राहू द्या, आपण भाजपाबरोबर जाऊ. हे सुरु असताना एक माणूस ढसाढसा रडला. त्या माणसाचं नाव आहे जयंत पाटील. मग त्यांनी सांगितलं की आपण एक पत्र लिहू ते शरद पवार यांना दाखवू. त्यावेळी काही टपलेले लोक म्हणाले की जितेंद्रला विचारा, तेव्हा मी म्हटले हो सही करायला तयार आहे जर शरद पवारांनी सांगितले तर तो निर्णय मान्य. अजित पवारांनी निर्माण केलेला दरारा आणि दहशत याचा त्यावेळी मी बळी ठरलो.

आव्हाड म्हणतात, अजित पवार यांच्या तोंडावर नाही म्हणणे शयच नव्हते मला त्या काळात; पण आज महाराष्ट्राला सांगू इच्छितो की ते पत्र जयंत पाटील यांनी आपल्या खिशात ठेवून घरी नेले. त्यांनी आयुष्यात ते पत्र शरद पवार यांच्यापर्यंत पोहचवलेच नाही. शरद पवार यांना एकटे सोडून आपण भाजपबरोबर जाणे मला पटत नाही, असे ते मला म्हणाले. तसेच पत्र देत नाही असेही म्हणाले. तेव्हा मी त्यांना म्हटलं सर्वात आधी काय कराल तर माझे नाव त्यातून काढा. त्यावेळी अजून एक माणूस होता ज्याचे नाव होते प्राजक्त तनपुरे. त्यानेही मला सांगितले जमणार नाही, मी त्याला सांगितले की तू जा. त्यावेळी अशी माणसही होती ज्यांना भाजपासह जायचे नाही. मी पण त्यावेळी त्या विचारांशी समझोता करायचा नाही, हा निर्णय घेऊनच बसलो होतो. असेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

मला त्यांची भितीच वाटायची…
शरद पवार यांना त्यांच्या घरातूनच आव्हान दिले जाऊ शकते, हे चित्र निर्माण केले गेले. मी अजित पवार यांच्यापासून चार हात लांब राहायचो; कारण चारचौघात अपमान केला तर काय होईल? पाचव्या मिनिटाला सगळ्या महाराष्ट्रात तो अपमान पोहचणार. त्यापेक्षा चार हात लांब राहिलेले बरे. माझी आणि त्यांची ओळख १९८९ ची पण २०२२ पर्यंत मी त्यांच्या फार जवळ जाऊन बोललोच नाही, कारण मला त्यांची थोडी भीतीच वाटायची, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजप-राष्ट्रवादीचं ठरलं!, महापालिका निवडणुकीत युती; एमआयएमही उतरणार मैदानात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना आता...

नेपाळमध्ये राडा! आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधानांचा राजीनामा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक...

चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे शुक्रवारी भूमिपूजन; आमदार कर्डिले यांची माहिती, कोण कोण राहणार उपस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे भूमिपूजन येत्या शुक्रवार दिनांक 12...

विसर्जन मिरवणुकीत युवकाचा खून; कुठे घडली घटना?

सांगली । नगर सहयाद्री:- मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये सुरू...