spot_img
ब्रेकिंगअखेर जरांगे पाटील यांनी मागितली माफी? दिलगिरी व्यक्त करत म्हणाले, मी १००...

अखेर जरांगे पाटील यांनी मागितली माफी? दिलगिरी व्यक्त करत म्हणाले, मी १०० टक्के..

spot_img

जालना। नगर सहयाद्री
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागितली आहे. मी काही अपशब्द वापरले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझे शब्द मागे घेतो. असे एका वृत्तवाहिनीशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे यांनी आपल्या आमरण उपोषणावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी अपशब्द वापरले होते. त्यांच्या या शब्दांचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले होते. सरकारनेही या प्रकरणी कठोर भूमिका घेतली होती. परिणामी, मनोज जरांगे यांनी मंगळवारी एक पाऊल मागे घेत माफी मागितली आहे.

जरांगे पाटील नेमकं म्हणाले काय?
मी शिवीगाळ केली नाही. ते आमरण उपोषण होते. झाला प्रकार अनावधानाने झाला. मी आई-बहिणीवरून शिव्या दिल्या नाहीत. पण त्यांनी विधान भवनाच्या पटलावर मी असे बोलल्याचा दावा केला असेल, तर मी माझे शब्द मागे घेतो. दिलगिरी व्यक्त करतो.आमच्यासाठी आई -बहिणींहून काहीच मोठे नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालवणारे आहोत. त्यामुळे आमच्या तोंडातून चुकीचे शब्द गेले असतील तर मी १०० टक्के शब्द मागे घेतो व दिलगिरी व्यक्त करतो, असे जरांगे म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...