spot_img
महाराष्ट्रअंतरवालीतील मंडप हटवल्याचं वृत्त येताच जरांगे रुग्णालयातून निघाले...पण पोलिसांनी..

अंतरवालीतील मंडप हटवल्याचं वृत्त येताच जरांगे रुग्णालयातून निघाले…पण पोलिसांनी..

spot_img

जालना / नगर सहयाद्री : मराठा आरक्षण आंदोलन दिवसागणिक वेगवेगळं वळण घेताना पाहायला मिळत आहे. या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत आक्षेपार्ह भाषेचाही वापर केला.

त्यानंतर सरकारने कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली असून आज सकाळीच जरांगे पाटील यांची एसटीआयटीच्या मार्फत चौकशी करण्यात यावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिल्या होत्या. त्यानंतर आता पोलिसांकडून अंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळावरील मंडप हटवण्यास सुरुवात करण्यात आल्याचे वृत्त समोर आले. याबाबतची माहिती मिळताच रुग्णालयात असणारे मनोज जरांगे हे उपचार सोडून तातडीने अंतरवालीकडे निघाले होते. मात्र पोलिसांनी मंडप हटवण्यात येणार नसल्याचं आश्वासन दिल्यानंतर जरांगे हे पुन्हा रुग्णालयातच थांबले आहेत.

मंडप हटवण्याच्या हालचालींबाबत मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आक्रमक इशारा दिला आहे. “मंडप हटवत असल्याची बातमी आल्यानंतर सगळीकडेच खळबळ झाली होती. कारण गृहमंत्री वागतातच तसे. मात्र आता डीवायएसपी साहेबांनी आम्हाला मंडप हटवणार नसल्याचं आश्वासन दिलं आहे. त्यांच्या शब्दाला मान देऊन मी इथं थांबत आहे.

नाही तर मी थेट अंतरवालीला निघालो होतो. दिलेला शब्द पाळा. मंडपाला, छत्रपतींच्या मूर्तीला हात लावला तर गृहमंत्र्यांना सुट्टी नाही,” असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. दरम्यान, “मला बळजबरीने अटक करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील करोडो मराठे उपोषण करतील. सरकारने मराठ्यांचा रोष ओढावून घेऊ नये. अजूनही वेळ गेली नाही. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा,” अशी मागणीही जरांगेंनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हनी ट्रॅपचा धक्कादायक प्रकार! ‘जीवनसाथी डॉट कॉम’ बनावट आयडी, पुढे घडलं असं काही..

मुंबई । नगर सहयाद्री:- हनी ट्रॅपचा वापर करत ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या वेबसाइटवरून महिलांना...

महायुती सरकारचा धडाकेबाज निर्णय; गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणं हटवणार

मुंबई। नगर सहयाद्री:- महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेतले आहे. साच एक...

लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! २१०० रुपये कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली आहे....

आयुक्त साहेब, चमकोगिरी नको फिल्डवर काम दाखवा; कोतकर काय म्हणाले पहा…

मनोज कोतकर | मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट | आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर शहरात भटया...