spot_img
अहमदनगरपारनेर तालुक्यात जलतारा प्रकल्प राबविणार; सुजित झावरे पाटील

पारनेर तालुक्यात जलतारा प्रकल्प राबविणार; सुजित झावरे पाटील

spot_img

धोत्रे बुद्रुक येथे जलतारा प्रकल्प शुभारंभ

पारनेर । नगर सहयाद्री:-
भविष्यात पारनेर तालुक्यातील गावोगावी जलतारा प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी अडविण्याचे काम तसेच पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना याबाबतचे मार्गदर्शन शिबिर घेऊन गावोगावी हा प्रकल्प राबविण्याचा मानस असल्याचे अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.

धोत्रे बुद्रुक येथे जलतारा प्रकल्प शुभारंभ सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते तसेच पुरुषोत्तम वायाळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. जलतारा प्रकल्प प्रमुख पुरुषोत्तम वायाळ यांच्या संकल्पनेतून यापूर्वी २४५ हून अधिक गावामध्ये जलतारा प्रकल्प झालेला आहे. पाणी अडविण्याचा दृष्टीने अतिशय प्रभावी ठरणारा हा उपक्रम असेल प्रकल्प राबवून त्या त्या गावातील पाण्याची पातळी वाढवून सदर प्रकल्प हा सिध्द केला आहे.
आज धोत्रे गावामध्ये या जलतारा उपक्रमाचा प्रत्यक्षात शुभारंभ करण्यात आला.

या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना शेत पुनर्भरण यामध्ये चार बाय चार आणि सहा फूट खोल प्रत्येक एकरामध्ये खड्डा खोदून त्यामध्ये पावसाचे पाणी मुरवण्याचे काम या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात या पुनर्भरणाच्या खड्ड्याच्या माध्यमातून हजारो लिटर पाणी जमिनीत मुरण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

यावेळी पाणी फाउंडेशनचे सातपुते साहेब, वॉटर संस्थेचे वनिता कुबर , सरपंच, उपसरपंच, जालिंदर भांड, अशोक कटारिया, रेवननाथ भांड सर, स्वप्निल राहिंज, कुंडलिक भांड, बापु भांड, सुधीर भांड, ज्ञानदेव तागड, विकास रोहोकले, विनोद रोकडे, विनायक भांड यश रहाणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संशयाच्या भुताने संसाराची राख रांगोळी; पत्नीचा निर्घुण खून

पत्नीचा निर्घुण खून । पतीला अटक अहिल्यानगर। नगर सहयाद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे...

पेट्रोल पंपावर ऑनलाइन पेमेंट बंद! कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री:- डिजिटलच्या युगात सर्व ऑनलाइन झाले आहे. पेट्रोल भरल्यानंतरही आपण ऑनलाइन पद्धतीने...

धनलक्ष्मीचा योग आला! ‘या’ राशींच्या जीवनात पैशांचा पाऊस पडणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य एकदा का हे प्रश्न सुटले की घरातील वातावरण...

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...