spot_img
अहमदनगरजय श्रीराम.. जय श्री हनुमानाच्या जयजयकारात हनुमान जन्मोत्सव साजरा

जय श्रीराम.. जय श्री हनुमानाच्या जयजयकारात हनुमान जन्मोत्सव साजरा

spot_img

मंदिरांमध्ये भाविकांची पहाटे पासून दर्शनाला गर्दी
अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर शहरात हनुमान जयंती मोठ्या उत्सहात व भक्तिपूर्ण वातावरणात साजरी झाली. शहरात सर्व भागांमध्ये मोठ्या संख्येने रामभक्त हनुमानाची मंदिरे आहेत. अयोध्येत श्रीराम मंदिर झाल्याने नुकतीच श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी झाल्यानंतर आज रामभक्त हनुमानाचाही जन्मोत्सव शहरात मोठ्या उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात साजरा झाला.

शहरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सर्जेपुरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात सूर्योदय वेळी हनुमान जयंती भक्तिभावाने साजरी झाली. यानिमित्त पहाटे हनुमानाच्या मूर्तीला महाभिषेक व विधिवत पुजा करून हनुमान चालीसा पाठ, श्रीराम नामाचा जप व आरती करून हनुमंताच जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

बरोबर सुर्यदयाच्या वेळी उपस्थित शेकडो भाविकांनी जय श्रीराम… जय श्री हनुमान… असा जयजयकार करत पाळणा हलवून हनुमानाचा जन्मोत्सव साजरा केला.श्री हनुमान जयंतीनिमित्त येथील मंदिरामध्ये पहाटे पासूनच भाविकांची दर्शनासाठी लगबग सुरू होती. यानिमित्त मंदिरात अंतर्गत सजावट व मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

स्पीकरवर हनुमान चालीसा पाठ व भक्तिगीते लावण्यात आली. हनुमान जयंती निमित्त सर्जापुरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे पुजारी कन्हैय्यालाल परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याआला, अशी माहिती प्रवीण परदेशी यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नेते बदलतात, पण जनता कधीच विसरत नाही; श्रीरामपूरसाठी डॉ. सुजय विखेंचा निर्धार..

  प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दत्तनगर येथे १०१ घरकुलांचे भूमिपूजन श्रीरामपूर : नगर सह्याद्री श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर गावठाण...

मळगंगा देवीच्या ८५ फूट उंचीच्या काठीची सवाद्य मिरवणूक लक्षवेधी

  काठीच्या मिरवणुकीत हजारो भावीकांचा सहभाग / मळगंगा देवीच्या जयजयकाराने परिसर निनादून गेला निघोज / नगर...

चहा विक्रेत्याचा मुलगा झाला डॉक्टर!; डोळ्यात पाणी आणणारा जीवन प्रवास..

जामखेड । नगर सहयाद्री बारावी परिक्षा पास झाल्यानंतर कोणतेही लाज न बाळगता चहाच्या दुकानात...

बीड का बिहार? विवाहितेचे ‘तसले’ फोटो केले व्हायरल!

Crime News: बीड आणि परभणीच्या घटनांनी सध्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढले आहे. महाराष्ट्रातील कायदा...