spot_img
अहमदनगरघर फोडायचा यांचा धंदाच, पाच वर्षांपूर्वी त्यांनी... ; विखेंची पवारांवर सडकून टीका

घर फोडायचा यांचा धंदाच, पाच वर्षांपूर्वी त्यांनी… ; विखेंची पवारांवर सडकून टीका

spot_img

संगमनेर / नगर सह्याद्री –
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काल बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात दौऱ्यावर होते. यावेळी थोरात समर्थक असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच ठिकठिकाणी विखे पाटलांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. काल दिवसभर निलेश लंके आणि शरद पवारांची भेट चर्चेत राहिली होती. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भेटीवरून विरोधकांवर निशाणा साधला आहे. पाच वर्षांपूर्वी पवार यांनी असाच प्रयोग केला होता असे सांगत घर फोडायचा यांचा धंदाच आहे त्याचेच फळ ते भोगताहेत असे ते म्हणाले.

संगमनेर तालुक्यातील विविध गावात तब्बल 145 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन विखे पाटलांनी काल केलं. खांबे येथील सभेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना निलेश लंके आणि शरद पवार यांच्या भेटीवर देखील भाषणातून निशाणा साधलाय. तसेच स्वतःला जाणता राजा म्हणवणाऱ्यांनी पाच वर्षांपूर्वी असाच प्रयोग करून पाहिला होता, अशी टीका देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
समोर कोण उभं राहिलं याचा मी फार विचार करत नाही. पाच वर्षांपूर्वी सुद्धा स्वतःला जाणता राजा म्हणवणाऱ्यांनी हा प्रयोग करून पाहिलाय. त्यावेळी तर आमच्या थोरल्या बंधूंना आमच्या विरोधात भाषण करायला लावली. लोकांचे घर फोडायचा यांचा धंदा आहे. मात्र आज त्यांचच घर फुटलं.परमेश्वराच्या दारात हे फेडावच लागतं. लोक विखे पाटलांना पाहून नव्हे तर भाजपच्या नेतृत्वाला पाहून मतदान करतात, असं विखे पाटील म्हणाले.

2019 च्या निवडणुकीत जनतेने भाजपा -शिवसेना युतीला मतदान केलं. मात्र उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केलं.विश्वासघाताचं राजकारण केलं. मात्र नियतीने वेगळंच ठरवलं होतं त्यामुळे आज सत्ता आपली आली, अशा शब्दांत विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

उपस्थितांना संबोधित करताना पुढे विखे पाटलांनी बाळासाहेब थोरात यांच्यावरही निशाणा साधला. संगमनेर तालुक्यात आम्ही केलेल्या कामांचं काहीजण भूमिपूजन उद्घाटन करतायत. पण जनतेला सगळं माहिती आहे. संगमनेरचे मॉडेल राज्याने घ्यावं असे इथले नेते सांगतात. या तालुक्यात 50 टँकर चालू आहे, हे मॉडेल राज्याने घ्यायचं का? आम्ही विकासाचं राजकारण करतो. रोजगारासाठी कधी या तालुक्यात मेळावा झाला का ?, असा सवाल यावेळी विखे पाटील यांनी उपस्थित केला. तसेच नाव न घेता थोरात यांच्यावर टीका केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संदीपदादा कोतकर विचार मंच महापालिकेसाठी ऍक्टिव्ह! ‘ते’ अभियान राबवत निवडणुकीची तयारी..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२५ मध्ये होतील असे...

देवेंद्रजी, लाडक्या बहिणी अन्‌‍ त्यांच्या लेकीबाळी राज्यात असुरक्षित झाल्यात!

सारिपाट | शिवाजी शिर्के:- लोकसभा अन्‌‍ त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकांचा धुराळा खाली बसत असताना आणि...

कृतनिश्चयी प्रधानसेवक!

Former Prime Minister Manmohan Singh : साधारण 2012 पासून, त्या वेळी पंतप्रधान पदावर असलेले...

बीडच्या घटनेची पुनरावृत्ती! सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रकार

Maharashtra Crime News: मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे बीड जिल्ह्यातलं राजकारण तापलं...