spot_img
अहमदनगर..ते तर बदल्याच्या भावनेतून 'षडयंत्र'! हातपाय बांधल्यासह डांबल्याचा मुलीने केला बनाव

..ते तर बदल्याच्या भावनेतून ‘षडयंत्र’! हातपाय बांधल्यासह डांबल्याचा मुलीने केला बनाव

spot_img

छेडछेडाच्या आधीच्या घटनेचा बदला घेण्याच्या भावनेतून रचले षडयंत्र | तोफखाना पोलिसांनी उघडकीस आणला बनाव
अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर शहरातील एका प्रथितयश महाविद्यालयातील एका तरुणीला हातपाय बांधून कोंडल्याचे आणि त्यातूनच तिच्या अंगावर बेंच टाकून डांबण्याचा कथीत प्रकार बनाव असल्याचे उघड करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले. तरुणीने यापूर्वी एका तरुणाच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्या गुन्ह्याचे कामकाज आता न्यायालयासमोर सुरू झाले असून त्यात फायदा मिळावा म्हणून सदर तरुणीने त्या तरुणाचा बदला घेण्याच्या भावनेतून हातपाय बांधल्याचे आणि अंगावर बेंच टाकून डांबल्याचे षडयंत्र रचल्याचे उघड झाले. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार बनाव असल्याचे समोर येताच तोफखाना पोलिसांनी आता हा गुन्हाच रद्द करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, नगरमधील एका नामांकीत महाविद्यालयातील पहिल्या वर्षात शिक्षण घेणार्‍या मुलीचे हातपाय बांधून तिच्या अंगावर वर्गातील सर्व बेंच टाकून डांबून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर मुलीने दिलेल्या माहितीनुसार तोंडाला रुमाल बांधलेल्या तीन- चार अनोळखी तरुणांनी तिला वर्गातील खोलीत मारहाण केली आणि त्यातूनच त्यांनी हातपाय बांधले व डांबले. वर्गातील बेंच अंगावर टाकले. त्यातून जखमाही झाल्याचे तिने त्यात म्हटले होते. दरम्यान, या प्रकाराने महाविद्यालय आणि संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. पालकांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

सदर घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. घटनाक्रम आणि घटनास्थळासह सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ही घटनाच संशयास्पद असल्याचे समोर आले. पोलिसांनी आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यातही काहीच आढळून आले नाही. यानंतर सदर मुलीला पोलिसांनी विश्वासात घेतले असता हा संपूर्ण प्रकार खोटा असल्याचे तिने कबूल केले. यापूर्वी या मुलीचा विनयभंग आणि छेड ज्याने काढली व याबाबत ज्याच्यावर गुन्हा दाखल होता, त्याच्यावरच तरुणीने संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी याबाबत अधिक माहिती घेतली असता सदर तरुणाला गुन्ह्यात अडकविण्यासाठी आपण हा बनाव रचल्याचे तिने मान्य केले. तोफखाना पोलिसांनी अत्यंत योग्यपद्धतीने हा गुन्हा हाताळला आणि खोटा गुन्हा उघडकीस आणला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शासकीय कामात अडथळा; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की...

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...