IPL 2024 Auction : IPL 2024 साठी आज खेळाडूंचे लिलाव सध्या सुरु आहेत. दुबईत हे लिलाव होत आहेत. ३३३ खेळाडू रिंगणात असून ७७ खेळाडूंना संधी मिळणार आहे. गुजरात टायटन्सच्या फ्रँचायझीकडे सर्वाधिक ३८.१५ कोटी रुपये आहेत. तर, लखनौ सुपर जायंट्सकडे सर्वात कमी १३.१५ कोटी रुपये आहेत.
* मिचेल स्टार्क इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
दरम्यान या लिलावात इतिहास घडला असून मिचेल स्टार्क इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलाय. या प्लेअरसाठी कोलकाता आणि गुजरात यांच्यात लढत लागली होती. बोलीचा हा आकडा थेट २४ कोटी ७५ लाख रूपयांवर गेला. कोलाकाता नाईट रायडर्स संघाने त्याला खरेदी केले. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
* शिवम मावी
मावीची मूळ किंमत ५० लाख आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बोली लावली होती. शेवटी लखनऊने शिवम मावीला ६.४० कोटींना विकत घेतले.
* दोन खेळाडू अनसोल्ड
जोस इंग्लिस आणि कुसल मेंडिस दोघेही अनसोल्ड राहिले आहेत. दोघांनाही कोणीच घेतलं नाही.
* अनसोल्ड राहिलेले कॅप्ड फिरकीपटू
अकेल हौसेन – अनसोल्ड
मुजीब रहमान – अनसोल्ड
आदिल राशिद – अनसोल्ड
मोहम्मद वकार सलामखेल – अनसोल्ड
तबरेझ शम्सी – अनसोल्ड
ईश सोधी – अनसोल्ड
* डॅरेल मिचेलसाठी सीएसकेने मोजले 14 कोटी
डॅरेल मिचेल याची बेस प्राईज ही 1 कोटी होती. त्याला घेण्यासाठी पंजाब आणि दिल्लीच्या फ्रंचायसींमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली होती, त्यानंतर चेन्नईने एन्ट्री केली आणि. अखेर त्याला चेन्नईने 14 कोटी रूपयांन आपल्या संघात घेतलं आहे.