spot_img
तंत्रज्ञानअबब ! 'ही' आहे जगातील सर्वात महागडी बाईक, किंमत आहे 81,75,38,150 रुपये

अबब ! ‘ही’ आहे जगातील सर्वात महागडी बाईक, किंमत आहे 81,75,38,150 रुपये

spot_img

नगर सह्याद्री टीम : सध्या अनेक लोक बाईक वेडे आहेत. परंतु तुम्हाला माहित आहे का कि जगात अशी एक बाईक आहे कि जी सर्वात महागडी आहे? आज आपण या ठिकाणी त्या बाईक बद्दल पाहूया. ही बाईक विकत घेणे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. या बाईकचे नाव Neiman Marcus Limited Edition Fighter असे आहे. चला जाणून घेऊया या मोटारसायकलची खासियत काय आहे ज्यामुळे ती जगातील सर्वात महागडी मोटरसायकल बनते.

एका बाईकच्या किमतीत घ्याल 81 BMW कार
Neiman Marcus Limited Edition Fighter ची किंमत 11 मिलियन डॉलर म्हणजे भारतीय चलनात सुमारे 81.75 कोटी (81,75,38,150) आहे. मोटारसायकलची लिलाव किंमत 110,000 डॉलर पासून सुरू झाली परंतु अखेरीस ती 11 मिलियन डॉलर क्षमध्ये विकली गेली आणि किंमत जवळपास 100 पट जास्त आली. या बाईकचे फक्त 45 मॉडेल्स तयार करण्यात आले होते. म्हणूनच याला लिमिटेड एडिशन असे नाव देण्यात आले आहे.

या साध्या कंपनीने बनवली आहे ‘ही’ युनिक बाईक
विशेष म्हणजे नीमन मार्कस कंपनी ही ऑटोमोबाईल कंपनी नसून लक्झरी डिपार्टमेंट स्टोअर ब्रँड आहे. पण जेव्हा या कंपनीने ही मोटरसायकल लिलावासाठी लाँच केली तेव्हा तिच्या किमती इतक्या वाढल्या की ही बाईक जगातील सर्वात महागडी बाईक बनली. ही मोटारसायकल दिसते त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे, असा कंपनीचा विश्वास आहे.

 हि आहे बाईकची खासियत
ही बाईक काही सेकंदात 300 kmph चा टॉप स्पीड गाठू शकते. त्याची बॉडी टायटॅनियम, अॅल्युमिनियम आणि कार्बन फायबरपासून बनलेली आहे आणि ती खूप आलिशान दिसते. या बाईकला ‘इव्होल्यूशन ऑफ द मशीन’ असे म्हटले जात होते. हे 120ci 45-डिग्री एअर-कूल्ड व्ही-ट्विन इंजिनद्वारे समर्थित आहे, जे या बाईकला शक्तिशाली बनवते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...