spot_img
आर्थिकSuccess story : एका अंध व्यक्तीने सुरु केला छोटा व्यवसाय,अवघ्या 29 व्या...

Success story : एका अंध व्यक्तीने सुरु केला छोटा व्यवसाय,अवघ्या 29 व्या वर्षी बनला करोडोंच्या कंपनीचा  मालक

spot_img

नगर सहयाद्री टीम : अपंगत्व असणे म्हणजे फार मोठी कमतरता असते असे म्हटले जाते. असे म्हणतात की अपंगत्व हे जगातील सर्वात मोठे दुःख आहे, जे कोणीही दूर करू शकत नाही. यात जर कुणी अंध असेल तर त्याच्या दुःखाला सीमा नसते. पण एका अंध युवकाने असे काहीतरी करून दाखवले की  तो 100 कोटींची उलाढाल असलेल्या एका मोठ्या कंपनीचा मालक बनला आहे. चला जाणून घेऊयात –

सदर व्यक्तीचे नाव आहे श्रीकांत बोल्ला. ते आंध्रप्रदेश मधील आहेत. श्रीकांतचा जन्म 1992 मध्ये आंध्र प्रदेशातील मछलीपट्टनमच्या सीतारामपुरम गावात झाला. तो जन्मापासूनच आंधळा होता. त्याच्या जन्मानंतर, जेव्हा पालकांनी पाहिले की आपला मुलगा पूर्णपणे आंधळा आहे, तेव्हा त्यांच्या दु:खास  सीमा राहिली नाही. काही लोकांनी त्याला अनाथाश्रमात सोडण्याचा सल्ला दिला. परंतु पालकांनी त्यांचे ऐकले नाही आणि मुलाला वाढवण्याचा निर्णय घेतला.

शाळेत दाखल झाल्यावर  श्रीकांतशी भेदभाव केला गेला आणि त्याला त्याच्या वर्गाच्या मागच्या बाजूला बसवले गेले. यावर त्याचे वडील दामोदर राव आणि आई व्यंकटम्मा यांनी शाळा प्रशासनाचा निषेध केला. त्यानंतर श्रीकांतला पुढे बसवण्यात आले . व्यवस्थेविरुद्ध लढण्याच्या पालकांच्या भावनेने श्रीकांतमध्ये हिंमत निर्माण केली आणि तोही आयुष्यात काहीतरी करण्याची जिद्द मनाशी बाळगू लागला.

भारतात येऊन स्वतःची कंपनी सुरू केली
शिक्षण पूर्ण केल्यानंतर श्रीकांतला अमेरिकेत आरामदायी जीवन जगण्याची संधी मिळाली. पण भारतात येऊन काम करून देशवासीयांसाठी काहीतरी करावे, असे त्यांचे मन होते. त्यानंतर ते भारतात परतले आणि त्यांनी 2012 मध्ये बोलंट इंडस्ट्रीज ही स्वतःची कंपनी स्थापन केली. रतन टाटा यांनी त्यांची प्रतिभा आणि उद्योजकतेची आवड पाहिली. त्यांनी श्रीकांतला त्यांच्या एका युनिटचा मेंटर बनवले आणि त्यांच्या कंपनीत गुंतवणूकही केली.

श्रीकांतची बोलेंट इंडस्ट्रीज पॅकेजिंग सोल्यूशन्सचे काम करते. श्रीकांतच्या मेहनतीमुळे ती हळूहळू पुढे सरकली. कंपनीने 2018 पर्यंत 20% मासिक सरासरी वाढीसह रु. 150 कोटींचा व्यवसाय केला. आता श्रीकांतकडे 5 उत्पादन युनिट आहेत, ज्यात 650 हून अधिक लोक काम करतात.

आजवर अनेक पुरस्कार मिळाले
2017 मध्ये श्रीकांतचे नाव फोर्ब्स 30 अंडरमध्ये होते. आशियामधून निवडल्या गेलेल्या 3 भारतीयांपैकी तो एक होता. त्यांना CII इमर्जिंग एंटरप्रेन्योर ऑफ द इयर 2016, ECLIF मलेशिया इमर्जिंग लीडरशिप अवॉर्ड असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

एके काळी. 2006 मध्ये देशाचे माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम एका कार्यक्रमात बोलत होते. त्या कार्यक्रमात श्रीकांतही उपस्थित होता. कलाम यांनी  त्याला विचारले, ‘तुला आयुष्यात काय व्हायचे आहे?’ या प्रश्नावर श्रीकांतने उत्तर दिले, ‘मला भारताचा पहिला अंध राष्ट्रपती व्हायचे आहे.’

समाजासमोर आदर्श उदाहरण  
श्रीकांतने एमआयटी मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, ‘मला माझे जीवन समुदाय आणि समाजसेवेसाठी समर्पित करायचे आहे. मला समाजात असे  स्थान बनवायचे आहे जिथे लोक मला एक आदर्श आणि महान नेता म्हणून पाहतील.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहमदनगरच्या ‘या’ गावात धाडसी दरोडा! चोरीत चोरटे निघाले हुशार? नेमकं काय घडलं…

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील भिमा व घोडनदीच्या संगमावर असणार्या सांगवी दुमाला परिसरामध्ये धाडसी...

महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड करण्‍याची हीच संधी! मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला विश्‍वास

राहुरी । नगर सहयाद्री:- लोकसभा निवडणूकीत झालेल्‍या चुका पुन्‍हा होवू देवू नका, स्‍वत:च्या गावापासून काम...

जामिनावर सुटलेल्या आरोपीचे ‘भयंकर’ कृत्य! अल्पवयीन मुलीसोबत घडलं असं काही..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातील संगमनेरतालुक्यामध्ये मध्ये जामिनावर सुटलेल्या एका आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार...

‘सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप’

निघोज । नगर सहयाद्री जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब...