spot_img
आर्थिकInox India IPO : 14 डिसेंबरला येतोय 1459 कोटी रुपयांचा IPO, जाणून...

Inox India IPO : 14 डिसेंबरला येतोय 1459 कोटी रुपयांचा IPO, जाणून घ्या किंमत व सर्व माहिती

spot_img

Stock Marcket :
नगर सह्याद्री टीम : आयपीओ मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. क्रायोजेनिक स्टोरेज टँक मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनी Inox India चा IPO या आठवड्यात 14 डिसेंबर रोजी गुंतवणुकीसाठी ओपन होणार आहे. कंपनीने या IPO साठी 627-660 रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित केला असून IPO साइज सुमारे 1459 कोटी रुपये आहे. हा IPO 18 डिसेंबरपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला राहील. हा IPO ऑफर फॉर सेल असणार आहे.

IPO बद्दल जाणून घेऊयात –
आयनॉक्स इंडियाचा आयपीओ साइज 1459 कोटी रुपये आहे आणि तो पूर्णपणे ऑफर फॉर सेल आहे. ऑफर फॉर सेल अंतर्गत, प्रवर्तक सिद्धार्थ जैन (10,437,355 इक्विटी शेअर्स), पवन कुमार जैन (50,00,000 इक्विटी शेअर्स), नयनतारा जैन (50,00,000 इक्विटी शेअर्स) आणि इशिता जैन (12,00,000 इक्विटी शेअर्स) त्यांची विक्री करतील. या IPO मध्ये एका लॉट साइजमध्ये 22 शेअर्स आहेत.

अप्पर प्राइस बँडच्या बाबतीत, किमान 14,520 रुपये गुंतवणे आवश्यक आहे. तर गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉटसाठी 188,760 रुपयांची बोली लावू शकतात. या IPO मध्ये, 50 टक्के हिस्सा QIB साठी राखीव आहे, तर 35 टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि 15 टक्के हिस्सा NII साठी राखीव आहे.

या तारखा लक्षात ठेवा
IPO ओपनिंग : 14 डिसेंबर 2023
IPO ची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023
अँकर गुंतवणूकदारांसाठी: 13 डिसेंबर 2023
शेअर अलॉटमेंट : 19 डिसेंबर 2023
रिफंड : 20 डिसेंबर 2023
डीमॅट खात्यात क्रेडिट: 20 डिसेंबर 2023
IPO लिस्टिंग : 21 डिसेंबर 2023

कंपनी विषयी माहिती 
आयनॉक्स इंडिया लिमिटेड 30 वर्षांहून अधिक काळ क्रायोजेनिक उपकरणे आणि सिस्टम डिझाइन, अभियांत्रिकी, उत्पादन आणि इंस्‍टालेशन क्षेत्रात काम करत आहे. याने क्रायोजेनिक उपकरण क्षेत्रात लोकप्रिय ब्रँड INOXCVA स्थापन केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्याला गोळ्या घाला…; निंबळक बायपास चौकात रास्तारोको

हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गेल्या...

आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती; ‘महापालिका निवडणुकीसाठी आघाडी’; किरण काळे यांनी दिली मोठी माहिती..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम...

चुलत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पुतण्यावर धारदार शस्त्राने सपासप हल्ला, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- माझ्या शेतातील लाकडे का आणली? असा जाब विचारत एका तरुणाला...

शिवसेनेला भाजपचा झटका; ‘बड्या’ नेत्याचा भाजपत प्रवेश!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अहिल्यानगर शहरातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली...