spot_img
अहमदनगरपोलीस कर्मचार्‍यांच्या बदली प्रक्रियेला सुरुवात; 'त्या' कर्मचाऱ्यांच्याही झाल्या बदल्या

पोलीस कर्मचार्‍यांच्या बदली प्रक्रियेला सुरुवात; ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्याही झाल्या बदल्या

spot_img

एलसीबीतील आक्षेप घेतलेल्या कर्मचार्‍यांच्या झाल्या बदल्या

अहमदनगर | नगर सह्याद्री

अहमदनगर पोलिस दलातील पोलिस कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय बदल्यांना शनिवार पासून सुरूवात झाली आहे. सुमारे ४७६ पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहे. दरम्यान खा नीलेश लंके यांनी आक्षेप घेतलेल्या स्थानिक गुन्हे शाखेतील आक्षेप घेतलेल्या पोलिस कर्मचार्‍यांच्या देखील बदल्या करण्यात आल्याची माहिती आहे.

पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी जिल्हा पोलीस दलातील ४७६ पोलीस अंमलदारांच्या सर्वसाधारण प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. ज्या पोलीस अंमलदारांना ३१ मे, २०२४ रोजी एका पोलीस ठाण्यात/ शाखेत पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा अंमलदारांकडून तीन पसंतीच्या ठिकाणासह अर्ज मागविण्यात आले होते. अशा बदलीपात्र अंमलदारांना आज येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी ११ वाजल्यापासून या प्रक्रियेला सुरूवात झाली. यात पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करणार्‍या पोलीस अंमलदारांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात येत आहे.

दरम्यान खासदार नीलेश लंके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचार्‍यांवर आरोप केले होते. याबाबत त्यांनी उपोषणाचा देखील इशारा दिलेल्या होता. पोलिस प्रशासनातील आजपासून सुरू झालेल्या बदली प्रकियेत देखील आरोप करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांच्या देखील बदल्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...