spot_img
अहमदनगरनिघोजच्या वादळी ग्रामसभेत जत्रा हल्ला प्रकरण गाजले! ग्रामस्थांच्या वतीने 'तो' ठराव...

निघोजच्या वादळी ग्रामसभेत जत्रा हल्ला प्रकरण गाजले! ग्रामस्थांच्या वतीने ‘तो’ ठराव मंजूर

spot_img

निघोज। नगर सहयाद्री-
येथील वादळी ग्रामसभेत जत्रा हल्ला प्रकरणाचा निषेध करण्यात आला. तसेच माजी उपसभापती खंडू भुकन यांनी गुन्हेगारांवर मोक्का लावण्याची मागणी केली. या मागणीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ठरावाला पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबाजी वाघमारे, माजी उपसरपंच रामदास रसाळ यांनी अनुमोदन दिले. सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव ढवण यांनीही गुन्हेगारांना शिक्षा होऊन मोक्का लावण्याची मागणी केली तसेच स्थानिक पुढाऱ्यांनी या गुन्हेगारांना पाठीशी न घालता गावात शिस्त राहण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली.

मंगळवार दि. ९ जुलै रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा पाठपुरावा करण्यासाठी ही ग्रामसभा आयोजित केली होती. सरपंच चित्राताई वराळ पाटील या सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी उपसरपंच माऊली वरखडे, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ पाटील, माजी उपसरपंच रामदास रसाळ, शिवव्याख्याते प्रा ज्ञानेश्वर कवाद, ग्रामपंचायत सदस्या सुधामती कवाद, भावना साळवे, ग्रामपंचायत सदस्य योगेश वाव्हळ, बाबासाहेब निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद, माजी सरपंच ठकाराम लंके, बाळासाहेब लंके, शिवाजीराव लंके, मंगेश वराळ, ग्रामसेवक संजय पवार, अनंतराव वरखडे, सतिष साळवे, विलासराव हारदे, सुनिल वराळ, शांताराम लाळगे, ठकाराम गायखे, सुनिल वराळ, शांताराम लाळगे, राहुल वराळ, मुकुंदराव निघोजकर, भास्करराव कवाद, सागर आतकर, संदीप ईधाटे, नाना पाटील वराळ, अमृताशेठ रसाळ, विश्वास शेटे, राजूशेठ वराळ, मंगेशशेठ लाळगे, भिमराव लामखडे, अस्लमभाई इनामदार, सुभाष वराळ, आप्पासाहेब वराळ पाटील, विलासराव हारदे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी वादळी ग्रामसभेमध्ये कृषी अधिकारी यांचे लक्ष नाही म्हणून दुकानदारांकडून युरिया मिळत नाही अशी तक्रार शेखर लंके, पंढरीनाथ लंके यांनी केली. तसेच राहुल वराळ यांनी मळगंगा विद्यालयाजवळील दारुचा धंदा बंद करण्याची मागणी केली. पत्रकार ठकाराम गायखे यांनी शरदचंद्रजी पवार अभ्यासिका ही मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट वापर करीत असून याचा ग्रामपंचायतने खुलासा करण्याची मागणी केली. विद्याधन कोचिंग क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष शिवव्याख्याते प्रा ज्ञानेश्वर कवाद यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. न्यू इंग्लिश स्कूलचे सचिव वसंत कवाद यांनी आमचे क्लासेस बंद करण्यासाठी मोहिम उघडली असून मी क्लासेस बंद करु का अशी विचारणा ग्रामसभेत केली. यांसह विकासकामे, शेती पानंद रस्ता, चारीवरील अतिक्रमण आदी विषय ग्रामसभेमध्ये चर्चेत आले. सकाळी दहा वाजता सुरू झालेली ही ग्रामसभा तब्बल दोन तास सुरू होती.

पत्रकार संघ विभागीय कार्यालय निघोज यासाठी ग्रामपंचायत गाळा उपलब्ध होण्यासाठी १५ स्थानिक पत्रकारांनी निवेदन दिले होते. राज्य मराठी पत्रकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समीर राजे, राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाचपुते, पारनेर तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष उदय शेरकर यांनी यासाठी विशेष शिफारस पत्र ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांना देऊन ग्रामपंचायत गाळा देण्याची मागणी केली होती.
याबद्दल या मान्यवरांना ज्येष्ठ मार्गदर्शक मुकुंदराव निघोजकर व पत्रकार मित्रांनी धन्यवाद व्यक्त करीत आभार मानले आहेत. ग्रामपंचायत सर्वेसर्वा सचिन वराळ पाटील यावेळी या विभागीय कार्यालयासाठी गाळा देण्याचे आश्वासन देऊन लवकरच कार्यवाही करण्याची ग्वाही पत्रकारांना दिली.

ग्रामपंचायतीमध्ये महिलांना सर्वतोपरी सहकार्य
मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी शासनाने कागदपत्रे कमी करुन चांगले काम केले आहे. यासाठी ग्रामविकास अधिकारी व कामगार तलाठी यांनी एकत्रितपणे सर्व्हे करुण जास्तीत जास्त कुटुंबांना या योजनेचा फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. ग्रामपंचायतीमध्ये महिलांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही सचिन वराळ पाटील यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...