spot_img
अहमदनगरज्याच्या नावातच जय त्यांचा विजय नक्की ! शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्यात खा.श्रीकांत...

ज्याच्या नावातच जय त्यांचा विजय नक्की ! शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्यात खा.श्रीकांत शिंदेंचे खा.सुजय विखेंना बळ

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री : जिल्ह्याच्या विकासात विखे पाटील परिवाराचे ५० वर्षांपासून मोठे योगदान आहे. त्यामुळेच त्यांची चौथी पिढी आज सत्तेत आहे. विकासाची परंपरा असेलेले सुजय विखे पाटील हे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार म्हणून मैदानात आहेत. त्यांच्या नावातच ‘जय’ आहे त्यामुळे त्यांचा विजय नक्की आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केले. ते नगर येथील शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलत होते.

नगर येथील माऊली सभागृह येथे शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे, शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे, महायुतीचे लोकसभेचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील, शिवसेनेचे नेते भाऊसाहेब चौधरी, जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, शिवसेनेच्या स्थानिक महिला नेत्या शबनम इनामदार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचा विजय नक्की असून, ही निवडणूक व्यक्तीची निवडणूक नसून विचारांची निवडणूक आहे. यामुळे शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने महायुतीच्या उमेदवाला निवडून आणण्यासाठी मतभेत विसरून एकदिलाने काम करणे गरजेचे आहे असे शिंदे म्हणाले. शिंदे यांनी यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने डॉ. सुजय विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार करत असल्याचे सांगितले.

मंत्री दादासाहेब भुसे कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले, ही निवडणूक महाराष्ट्र आणि देशासाठी महत्वाची आहे. प्रत्येक उमेदवार हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करणार आहे. यामुळे डॉ. सुजय विखे पाटील यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावेत असे ते म्हणाले.

मी फक्त तुम्हाला विकास देऊ शकतो : खा. विखे
या मेळाव्यात डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचाराचा बिगुल वाजला असून सुजय विखे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, मी तुम्हाला फक्त विकास आणि विकासच देऊ शकतो. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे आहेत. यामुळे जिल्ह्याचा विकास हेच माझे एकमेव लक्ष असून ते मी अविरत करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. विखे पाटील यांनी आपल्या भाषणात देशाच्या प्रगतीचा उल्लेख करत ही निवडणूक व्यक्तीची निवडणूक नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठीची निवडणूक आहे. यामुळे सर्वांनी आपले मदभेद विसरून महायुतीच्या कामाला लागावे असे आवाहन केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...