spot_img
अहमदनगरAhmednagar News: पावसाळा तोंडावर, नाले साफसफाई कधी? 'निविदा प्रक्रिया अडकली आचारसंहितेच्या कचाट्यात'

Ahmednagar News: पावसाळा तोंडावर, नाले साफसफाई कधी? ‘निविदा प्रक्रिया अडकली आचारसंहितेच्या कचाट्यात’

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
पावसाळा अवघ्या दहा ते पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरीही अद्याप शहरातील ओढे व नाल्याच्या साफसफाईचे काम सुरू झालेले नाही. महापालिकेने राबवलेली निविदा प्रक्रियाही आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली आहे. मतदान होऊनही अद्याप आचारसंहिता शिथिल न झाल्याने निविदा मंजुरीला परवानगी मिळण्यासाठी महापालिका जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव सादर करणार आहे.

दरवर्षी पावसाळ्यात ओढे नाल्यातील गाळ व त्यावरील अतिक्रमणे, वळवलेले व बंदिस्त केलेले प्रवाह यामुळे अनेक भागातील घरात पावसाचे पाणी घुसण्याचे प्रकार घडतात. याबाबत महापालिकेने सर्वेक्षणही केलेले आहे. त्यानुसार शहरातील ४१ नैसर्गिक ओढे-नाल्यांवर अतिक्रमण झाल्याचे किंवा त्यावर बंद पाईप टाकून ते बंदिस्त करण्यात आल्याचे, नैसर्गिक प्रवाह वळवण्यात आल्याचे मनपाने सादर केलेल्या अहवालात उघड झालेले आहे.

शहरात एकूण ९५ किमीलांबीचे ओढे-नाले आहेत. तसेच मनपाच्या पथकाने केलेल्या पाहणीत शहरात १४० ठिकाणी पाणी तुंबत असल्याचे आढळून आले होते. हे प्रवाह मोकळे करण्यासह ओढे व नाल्यातील गाळ काढण्याचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी करणे अपेक्षित आहे.महापालिकेने या कामासाठी सुमारे ४१.३५ लाख रुपये खर्चाची निविदाही काढली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता अद्याप कायम असल्याने ही निविदा मंजूर होऊ शकलेली नाही.

अत्यावश्यक बाब म्हणून ही निविदा मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडून परवानगी घेण्यात येणार आहे. त्यानंतर नालेसफाईचे काम सुरू होणार आहे. दरम्यान, पावसाळा १५ दिवसांवर येऊन ठेपल्याने त्यापूर्वी सर्व ओढे नाल्यातील गाळ काढण्याचे व बंदिस्त प्रवाह मोकळे करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...

गाडिलकर कुटुंबियांकडून शेकडो ठेवीदारांना गंडा?; सिस्पेविरोधात अन्नत्याग आंदोलन

पारनेर | नगर सह्याद्री तालुक्यातील वाघुंडे येथील विनोद गाडिलकर व विक्रम गाडिलकर कुटुंबीयांनी दामदुप्पट सह...