spot_img
अहमदनगरAHMEDNAGAR CRIME NEWS : नगरमध्ये शिक्षकाने फासला माणुसकीला काळिमा; वर्गातच घडले नको...

AHMEDNAGAR CRIME NEWS : नगरमध्ये शिक्षकाने फासला माणुसकीला काळिमा; वर्गातच घडले नको ते…

spot_img

पैकीच्या पैकी मार्काचे अमिष दाखवून विद्यार्थीनीचा विनयभंग
अहमदनगर | नगर सह्याद्री –
AHMEDNAGAR CRIME NEWS प्रॅटीकलला पैकीचे पैकी मार्क पाहिजे असतील तर तुला मला काहितरी द्यावे लागेल, असे म्हणून शिक्षकानेच विद्यार्थिनीची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. नगर शहरातील एका महाविद्यालयात ही घटना घडली. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग, पोसो कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सतीष शिर्के (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. फिर्यादी अल्पवयीन मुलगी नगर शहरातील असून एका महाविद्यालयात शिक्षण घेते. सध्या तिचे प्रॅटीकल सुरू असून शिर्के तेथे शिक्षक आहे. तो फिर्यादीच्या एका विषयाचे प्रॅटीकल घेत आहे. ५ फेब्रुवारीला दुपारी दीड वाजता फिर्यादी विद्यालयात असताना शिर्के तिला म्हणाला, तुला प्रॅटीकलला पैकीचे पैकी मार्क पाहिजे असतील तर तुला मला काहितरी द्यावे लागेल’, परंतू फिर्यादीने त्याकडे दुर्लक्ष केले.

दरम्यान फिर्यादीला प्रॅटीकलला शून्य मार्क दिल्याने त्यासंदर्भात विचारणा करण्यासाठी ती ८ फेब्रुवारीला शिर्के याच्या केबिनमध्ये गेली असता त्याने लैंगिक शोषण करण्याच्या उद्देशाने अश्लिल हावभाव करून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. घडलेला प्रकार फिर्यादीने घरी सांगितला. शुक्रवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...