spot_img
राजकारणभुजबळ-जरांगे वादात सुप्रिया सुळेंनी भुजबळांना दिला महत्वाचा सल्ला, पहा..

भुजबळ-जरांगे वादात सुप्रिया सुळेंनी भुजबळांना दिला महत्वाचा सल्ला, पहा..

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री :
महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील एकमेकांवर आरोप करत आहेत. काल पुन्हा एकदा ओबीसी मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीत घेण्यास विरोध केला.

विशेष म्हणजे त्यांनी यावेळी शिंदे समिती बरखास्त करा, अशी धक्कादायक मागणीही केली. परंतु यानंतर मात्र राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. त्या मंत्री छगन भुजबळ यांना म्हणाल्या आहेत की, भुजबळ साहेब वयाने कर्तृत्वानं मोठे आहेत.

मला प्रांजळपणे एक गोष्ट सांगायची आहे. त्याबाबत गैरसमज नसावा. तुमचं जे मागणं आहे ते तुम्ही सरकारकडे मांडा. व्यासपीठावर ज्या मागण्या करता त्या बंद दरवाजामागे किंवा कॅबिनेटमध्ये केल्या तर बरं होईल असा सल्लाच त्यांनी दिला आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, राज्यात गलिच्छ राजकारण सुरू आहे. या दूषित होणाऱ्या या वातावरणाला जबाबदार खोके सरकार आहे. भुजबळांना महत्त्वाचं पद मिळाल असूनही या मंत्र्यांना  बोलायला बाहेरचं व्यासपीठ लागतंय म्हणजेच सरकारमधलं हे मिसमॅनेजमेंट दिसतंय अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

तसेच त्यांनी अवकाळी पाऊस सुरू असल्याने नुकसान झालं आहे. ज्या भागात नुकसान झालं आहे, त्या ठिकाणी सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...