spot_img
अहमदनगरमनपा प्रभाग रचनेबाबत महत्वाचे आदेश प्राप्त; सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना, असा आहे...

मनपा प्रभाग रचनेबाबत महत्वाचे आदेश प्राप्त; सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना, असा आहे कार्यक्रम

spot_img

सुनील चोभे | नगर सह्याद्री
महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने मंगळवारी दिल्यानंतर महापालिका स्तरावर हालचाली सुरु झाल्या होत्या. परंतु, प्रभाग रचनेबाबतचा कार्यक्रम, त्यासंबंधित सुचना महापालिकेला मिळालेल्या नव्हत्या. प्रभाग रचनेबाबतच्या सुचना, कार्यक्रम नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकण-छापवाले यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, नगर परिषदा, नगर पंचायतींचे मुख्याधिकारी यांना दिल्या आहेत. त्यानुसार 1 सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच अपेक्षित असल्याने सर्व 29 महानगरपालिका, 257 नगरपालिकांमध्ये प्रभागांची रचना करून ती राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करावी, असा आदेश नगरविकास विभागाने सर्व पालिकांना मंगळवारी दिला. मुंबईत 227 प्रभागांची संख्या कायम ठेवण्यात आली आहे. मुंबईवगळता अन्य महानगरपालिकांमध्ये चार सदस्यीय तर नगरपालिकांमध्ये दोन सदस्यीय प्रभाग पद्धत ठेवण्यात येणार आहे. या आदेशानुसार अहिल्यानगर महापालिका प्रशासनाकडून प्रभाग रचनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यात होण्याची शक्यता आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील प्रभागांची संख्या वाढविली होती. राज्यात सत्ताबदल झाल्यावर एकनाथ शिंदे यांच्या युती सरकारने 8 सप्टेंबर 2022 रोजी आधीच्या रचनेनुसार प्रभागांची संख्या कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. नगरविकास विभागाने काढलेल्या नव्या आदेशानुसार महानगरपालिकांमध्ये 8 सप्टेंबर 2022च्या निर्णयानुसार प्रभागांची संख्या गृहीत धरण्याची सूचना करण्यात आली आहे. नगरपालिकांमध्ये मात्र उद्धव ठाकरे सरकारने 25 जानेवारी 2022च्या निर्णयानुसार प्रभागांची संख्या कायम ठेवण्यात आली आहे.

असा आहे प्रभाग रचनेचा निवडणूक कार्यक्रम
11 ते 16 जून : प्रगणक गटाची मांडणी
17 ते 18 जून : जनगणनेची माहिती तपासणी
19 ते 23 जून : स्थळ पाहणी करणे
24 ते 26 जून : गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे
27 ते 30 जून : नकाशावर निश्चित केलेल्या प्रभागहद्दी जागेवर जावून तपासणे
1 ते 3 जुलै : प्रारुप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीच्या सह्या
4 ते 8 जुलै : प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठवणे
15 ते 21 जुलै : प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे, त्यावर हरकती व सूचना मागवणे
22 ते 31 जुलै : हरकतींवर सुनावणी घेणे
1 ते 7 ऑगस्ट : हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन अंतिम प्रभाग रचना आयोगाला पाठवणे
22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर : अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणीला रक्षाबंधनला ओवाळणी! खात्यात थेट ३००० हजार जमा होणार?

Ladki Bahin Yojana: रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी...

राज्यात तुफान पाऊस बरसणार; ‘या’ ७ जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Monsoon Update : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी, विदर्भात...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींसाठी गुरुवार छान, धन लाभ होण्याची शक्यता..

मुंबई । नगर सह्याद्री– मेष राशी भविष्य आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा...

शनी शिंगणापूर बनावट अ‍ॅप प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर; कोणाच्या खात्यावर पैसे जमा – एसपींनी दिली महत्वाची माहिती

चौकशीतून माहिती उघड | एसपी सोमनाथ घार्गे यांची माहिती अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शनैश्वर देवस्थानशी...