अहमदनगर / नगर सह्याद्री :
अहमदनगर जिल्ह्यातील काही पोलीस निरीक्षकांची इतर जिल्ह्यात तात्काळ बदली करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंघाने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी नाशिक परीक्षेत्रातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. ज्या पोलीस निरीक्षकांची सेवा तीन वर्षांपेक्षा जास्त झाली आहे अशा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. याअंतर्गत आता इतर जिल्ह्यातून काही अधिकारी नगरमध्ये येणार आहेत.
तोफखाना व कोतवाली पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांसह 10 जणांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या आहेत. तीन पोलिस निरीक्षकांना जिल्ह्यातच अकार्यकारी पदावर नियुक्त केले असून जिल्ह्यात नऊ नवीन पोलिस निरीक्षक नव्याने जिल्ह्यात आले आहेत. यात पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, विजय करे, संभाजी गायकवाड, या तिघांची निवडणूक कामकाजाशी संबंध येणार नाही, अशा शाखेत नियुक्ती होईल. तशी जागा उपलब्ध नसेल तर जिल्ह्याबाहेर बदलीचा प्रस्ताव पाठवला जाईल अशी माहितीही मिळाली आहे. जिल्ह्यातील संजय सानप, विलास पुजारी, सोपान शिरसाठ, शिवाजी डोईफोडे यांची नाशिक ग्रामीणला बदली झाली आहे.
* कोणता अधिकारी कोठे ?
-सुहास चव्हाण हे सध्या आर्थिक गुन्हे शाखा येथे होते आता त्यांची बदली नंदूरबार येथे करण्यात आली आहे.
-वासुदेव देसले हे सध्या नगर येथे होते आता त्यांची बदली नंदूरबार येथे करण्यात आली आहे.
-हर्षवर्धन गवळी हे सध्या नगर येथे होते आता त्यांची बदली धुळे येथे करण्यात आली आहे.
-घनश्याम बळप हे सध्या नगर येथे होते आता त्यांची बदली नाशिक ग्रामीण येथे करण्यात आली आहे.
-मधुकर साळवे हे सध्या तोफखाना येथे होते आता त्यांची बदली जळगाव येथे करण्यात आली आहे.
-चंद्रशेखर यादव हे सध्या कोतवाली येथे होते आता त्यांची बदली धुळे येथे करण्यात आली आहे.