spot_img
ब्रेकिंगमाझं पाकीट मारलं तर चोरालाही टेन्शन...? एसआयटी चौकशीवर जरांगे पाटील स्पष्टच बोलले,...

माझं पाकीट मारलं तर चोरालाही टेन्शन…? एसआयटी चौकशीवर जरांगे पाटील स्पष्टच बोलले, वाचा सविस्तर

spot_img

सोलापूर । नगर सहयाद्री-
सगेसोयगरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून कायद्यात रुपांतर करा, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. सगेसोयर्‍यांचा मुद्दा मिटल्याशिवाय निवडणुका घेतल्या, तर मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

तसेच मी एसआयटी चौकशीला अजिबात घाबरत नाही. कारण मी कुणाचाही एक रुपया खाल्लेला नाही. माझं पाकिट चोरलं, तर उलट चोरालाही टेन्शन येईल असा टोलाही त्यांनी एसआयटी चौकशीवरून लगावला. सध्या जरांगेंनी संवाद दौरा सुरू केला असून आज (४ मार्च) ते सोलापुरात आहेत. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, बार्शी तालुयातील वैराग येथे सोमवारी दुपारी ११ वाजता मनोज जरांगेंचं आगमन झालं. यावेळी मराठा बांधवांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्य सरकारवर निशाणा साधला.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी तुम्हाला काहीच बोललो नाही. तरी पण तुम्हाला माझे शब्द लागले असतील, तर ज्यावेळी अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीमारात मराठा बांधव-भगिनींची डोकी फुटली, त्यावेळी तुम्हाला आई-बहीण दिसली नाही का?, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला.

तुम्हाला मी एक शब्द बोललो, तर इतका लागला. पण माझ्या आई-बहिणींना तुम्ही केलेल्या लाठीमारामुळे आजही शेतात जाता येत नाही. त्यांचे पाय मोडले आहेत. त्यावेळेस तुम्हाला थोडी कशी लाज वाटली नाही, अशी घणाघाती टीका देखील जरांगे यांनी फडणवीसांवर केली.

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी जेव्हा संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होतो, तेव्हा सरकारने माझ्यावर एसआयटी नेमली. मी एसआयटी चौकशीला अजिबात घाबरत नाही. कारण मी कुणाचाही एक रुपया खाल्लेला नाही. माझं पाकिट चोरलं, तर उलट चोरालाही टेन्शन येईल, असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

सांगली / नगर सह्याद्री : सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय...

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड...

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

शिर्डी / नगर सह्याद्री - साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार...