spot_img
अहमदनगरविद्युत पुरवठा खंडित केल्यास काळे फसणार, आमदारांनी दिला असा सल्ला...

विद्युत पुरवठा खंडित केल्यास काळे फसणार, आमदारांनी दिला असा सल्ला…

spot_img

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांचा इशारा
अहमदनगर / नगर सह्याद्री
नागरिकांमध्ये दिवाळी सणाचा उत्साह असताना सणासुदीच्या काळामध्ये नगर शहरासह कापड बाजारामध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे व्यापारी व नागरिक यांच्यामध्ये संताप व्यक्त होत आहे. जिल्हाभरातून नागरिक खरेदीसाठी नगर शहरात येत आहे, कापड बाजारामध्ये आधीच मंदीचे दिवस असून आता दिवाळी निमित्त ग्राहक मोठ्या संख्येने बाजारात येत असून त्यात वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने त्याचा खरेदी विक्रीवर परिणाम होत आहे. सणासुदीच्या काळात वीज पुरवठा खंडित केल्यास अधीक्षक अभियंत्यांना काळे फासण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी दिलाय.

कापड बाजारातील विद्युत पुरवठा अखंडित सुरु राहण्यासाठी अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले . यावेळी व्यापारी किरण व्होरा, शाम देडगावकर, प्रकाश बायड, दीपक नवलानी, राहुल मुथा, प्रतिक बोगावात, अभय गांधी, शामभाऊ काथेड, सोनू भटेजा, सुमित कुलकर्णी, गजेंद्र भांडवलकर, सोमा तांबे, शुभम टाक, बाबू औताडे, सचिन निक्रड, एम जी रोड असोसिएशन, वंदे मातरम ग्रुप, व व्यापारी महासंघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते,

आ. संग्राम जगताप यांनी अधिक्षक अभियंता प्रकाश खांडेकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधत सांगितले की, सणासुदीच्या काळात विद्युत पुरवठा खंडित करू नये, आता दिवाळी सण सुरु असून नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाजारात गर्दी करत आहे. तरी विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी विद्युत पुरवठा विभागाची यंत्रणा सज्ज ठेवावी असे आदेश दिले त्यावर अधिक्षक अभियंता प्रकाश खांडेकर यांनी कापड बाजारात तातडीने अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल असे सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम ‘या’ दिवशी जाहीर होणार?

माय नगर वेब टीम Zilla Parishad Panchayat Samiti Election : येत्या २ डिसेंबर २०२५...

बीड पुन्हा हादरलं; ४ जणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं

बीड / नगर सह्याद्री - बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथे शेतीच्या वादातून चार जणांना...

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव, नेमकं काय केल?

नगर सह्याद्री वेब टीम Sonakshi Sinha : बॉलिवूडची फिटनेस क्वीन अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज अभिनय,...

नालायक सरकार… मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री...