spot_img
अहमदनगर'IAS अधिकारी पूजा खेडकरचे वडील विधानसभा लढवणार'; 'या' मतदार संघात नशीब आजमावणार

‘IAS अधिकारी पूजा खेडकरचे वडील विधानसभा लढवणार’; ‘या’ मतदार संघात नशीब आजमावणार

spot_img

अ.नगर । नगर सहयाद्री:-
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून राज्यासह देशभरात चर्चेत असलेली निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांनी आता येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. पूजाचे वडील दिलीप खेडकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ते अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथड मतदारसंघातून विधानसभेसाठी नशीब आजमावणार आहेत.

वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. शेवगाव-पाथड विधानसभा मतदार संघातून ते निवडणुकीची तयारी करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीत जरी माझा पराभव झालेला असला तरी प्रस्थापीतांना त्यांचा पराभव माझ्यामुळे झाला असल्याच वाटत आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने मला व माझ्या कुटुंबीयांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे मला जरी राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी मी विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे दिलीप खेडकर म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शिरसाटवाडी मतदान केंद्रावर काय घडलं?; काय म्हणाल्या आमदार मोनिकाताईं राजळे? वाचा सविस्तर..

पाथर्डी | नगर सह्याद्री:- विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी पार पडली. आररोप प्रत्यारोप, कुठे पैशाचे...

अदानी अडचणीत; अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल; काय आहे नेमके प्रकरण?

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - उद्योगपती गौतम अदानी यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे....

CM पदाबाबत संजय राऊत यांचे मोठे विधान; थेट तारीख आणि वेळच सांगून टाकली

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : विधानसभा निडवणुकीच्या मतदानानंतर बुधवारी समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीच्या...

विजयाचा कॉन्फिडन्स! निकालापूर्वीच आमदार जगताप यांचे झळकले बॅनर

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले. जिल्ह्यातील 12 ही विधानसभा मतदारसंघात...