spot_img
राजकारण'मुख्यमंत्री शिंदे नसते तर मी जिवंत राहिलो नसतो', राष्ट्रवादीचे एकनाथ खडसेंचे मोठे...

‘मुख्यमंत्री शिंदे नसते तर मी जिवंत राहिलो नसतो’, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसेंचे मोठे वक्तव्य

spot_img

नगर सह्याद्री / मुंबई : राष्ट्रवादीचे आ. एकनाथ खडसे यांना हृदविकाराचा झटका आला होता. त्यांना तातडीने जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

त्यानंतर त्यांना मुंबईत न्यावे लागले. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली. एकनाथ खडसे यांची प्रकृती आता व्यवस्थित झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी वेळीच मदत केल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. जर तुमचे विमान वेळेवर टेक ऑफ झाले नसते तर माझ्या आयुष्याचे विमान कधीच लँड झाले नसते, असे खडसे म्हणाले.

म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नसते तर मी जिवंत राहिलो नसतो असं त्यांना सुचवायचं होत. यातून त्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
एकनाथ खडसे यांनी यावेळी घडलेला संपूर्ण प्रकार शिंदे यांना सांगितला. तसंच आता प्रकृती ठीक असल्याचंही कळवलं. “आपण वेळेवर मदतीला धावून आलात. मदत करने वाला बडा होता है. तुम्ही तातडीनं एअर अॅम्ब्युलन्स पाठवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार, आपलं विमान जर वेळेवर आलं नसतं तर आमच्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं”, असं खडसे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खडसे यांची विचारपूस करत काळजी घ्या असं म्हटलं आहे. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये खडसे यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया पार पडली आहे. डॉक्टरांनी शॉक ट्रीटमेंट देऊन बंद पडलेल हृदय पुन्हा सुरू केलं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अभिनेत्री कंगनाची पोस्ट चर्चेत, महिलांना पुरुषांची गरज पण…

मुंबई। नगर सहयाद्री अभिनेत्री कंगना रनौत कायम चर्चेत असते. आता देखील तिने एक पोस्ट शेअर...

काका अजित पवारांचा पुतण्या रोहित पवारांवर मोठा राजकीय वार ! घणाघाती टीका

कर्जत / नगर सह्याद्री : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत सरकारमध्ये...

सोने खरेदी करताना बिलाचे महत्व काय? खरे बिल कसे असावे? जाणून घ्या

नगर सह्याद्री टीम : सोन्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. गुंतवणुकीसाठी अनेक लोक सोने खरेदी...

शेतकऱ्यांना मालामाल करेल ‘ही’ वनस्पती, शेकडो महिलांनी कमवलेत लाखो रुपये

नगर सह्याद्री टीम : Lemongrass Farming : प्रत्येकाला कमी खर्चात चांगला नफा मिळवायचा असतो आणि...