spot_img
अहमदनगर'मी' मौल्यवान साडीच देणार, सावत्र भावाप्रमाणे छत्री नाही?; आ.राम शिंदेंनी साधला आ....

‘मी’ मौल्यवान साडीच देणार, सावत्र भावाप्रमाणे छत्री नाही?; आ.राम शिंदेंनी साधला आ. रोहीत पवारांवर निशाणा

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री:-
मी तुमचा लाडका भाऊ आहे सावत्र नाही. त्यामुळे ओवाळणीत मौल्यवान साडीच देणार, सावत्र भावाप्रमाणे छत्री देणार नाही. सुरुवातीला चॉकलेट, बिस्कीट वाटले, आता पाच वर्षे संपत आले की, कंपास पेटी अन् तीही मोकळीच अशा शब्दात आ प्रा. राम शिंदे यांनी आ. रोहित पवार यांचे नाव न घेता निशाणा साधला. जामखेड येथे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या सर्व आधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका,अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, समुहबचतगट, सीआरपी, आदींचा मंत्री आ. प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता.

यावेळी माजी सभापती आशा शिंदे, जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, प्रा. सचिन गायवळ, डॉ. भगवान मुरुमकर, अजय काशीद, नगरसेवक मोहन पवार, पवन राळेभात, विष्णू गंभीरे, अर्चना राळेभात, संजीवनी पाटील, दिपाली गर्जे, संगीता पारे, मनिषा मोहळकर, वर्षा उबाळे, रवि सुरवसे, बाजीराव गोपाळघरे, गोरख घनवट, डॉ. अल्ताफ शेख, महारूद्र महारनवर, उध्दव हुलगुंडे, महालिंग कोरे, गौतम उतेकर, यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पूढे बोलताना आ. राम शिंदे म्हणाले की, आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदारसंघातील गावागावात जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मी खंबीरपणे पाठीशी उभा आहे. मनात ठेवा झाकली मूठ सव्वा लाखाची, योग्यवेळी आपण मला सहकार्य द्या असे आवाहन त्यांनी केले.शासनाची कोणतीही योजना यशस्वी करण्यासाठी तळागाळापर्यंत मोलाचे काम करणाऱ्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे.

महिलांचा मान सन्मान वाढण्यासाठी त्यांच्या हातात पैसा आला पाहिजे. त्यासाठीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेद्वारे दर महिन्याला १५ कोटींपेक्षा जास्त रक्कम जामखेड तालुक्याला मिळत आहे. मी आमदार व मंत्री असतांना प्रामाणिकपणे काम केले म्हणूनच मला पुन्हा विधानपरिषदेत आमदारकी मिळाली.यावेळी प्रा. मधुकर राळेभात यांनीही मनोगत व्यक्त केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर; राष्ट्रवादी पक्षाकडून एबी फॉर्म प्राप्त

राणीताई निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर; राष्ट्रवादी पक्षाकडून एबी फॉर्म प्राप्त महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर...

राणीताई लंके यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब?; महायुतीत एकमत होईना

तिरंगी-चौरंगी लढतीची शक्यता गणेश जगदाळे | नगर सह्याद्री विधानसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहे. पारनेर...

पवारांच्या नातवाकडून कर्जत-जामखेडकरांचा भ्रमनिरास; रोहित पवारांविरोधात तरुणाई देखील एकवटली

साधा माणूस म्हणून राम शिंदेंचा मार्ग झाला अधिक सुकर कर्जत | नगर सह्याद्री पवारांचा नातू म्हणून...

जागावाटपाआधीच आघाडीत बिघाडी; काँग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीचा अर्ज…

मुंबई / नगर सह्याद्री - महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे सूत्र अद्याप जाहीर झालेले नाही. कोणती...