spot_img
राजकारण'मी सर्व भाषणे मागे घेतो..सरकारच मनोज जरांगेंना वेठीस धरतंय', छगन भुजबळांच्या वक्तव्याने...

‘मी सर्व भाषणे मागे घेतो..सरकारच मनोज जरांगेंना वेठीस धरतंय’, छगन भुजबळांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण वरून वातावरण चांगलेच गरम झाले आहे. यावरून ओबीसी व मराठा समाज यांतील वातावरणही वातावरण गरमागरम झाले आहे. आरक्षणाबाबत राज्य सरकारला दिलेली २४ डिसेंबर डेडलाइन जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या शिष्टमंडळाने काल जरांगे पाटील यांची आंदोलनस्थळी जात भेट घेतली. या दरम्यान सरकारने आधी लिहून दिल्याप्रमाणे

एखाद्याची नोंद आढळल्यानंतर सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी जरांगेंकडून करण्यात आली. सरकारकडून जरांगे पाटलांच्या मागण्यांना विशेष महत्त्व दिलं जात असल्याच्या मुद्द्यावरून आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारवर उपरोधिक शैलीत जोरदार हल्ला चढवला आहे.

काय म्हणाले भुजबळ
“सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या पाहिजेत. एखाद्या महिलेची कुणबी नोंद आढळल्यानंतर तिच्या आई-वडिलांना, सासू-सासऱ्यांना सगळ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र द्यायला हवं. एवढंच कशाला, मंत्र्यांचे दोन-तीन बंगलेही जरांगेंच्या उपोषणस्थळीच बांधायला हवे.

तसंच मुख्य सचिवांचाही बंगला तिकडेच बांधायला हवा. म्हणजे जरांगेंनी एखादी मागणी केली की लगेच त्याचा जीआर सरकारला काढता येईल. बंगलेच तिकडे बांधल्याने जाण्या-येण्याचा वेळही वाचेल,” असं म्हणत छगन भुजबळ यांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे. छगन भुजबळ यांनी आज जरांगे यांच्याविरोधात न बोलता उपरोधिक शैलीत सरकारलाच लक्ष्य केलं.

पत्रकार परिषदेत भुजबळ यांना विचारले की, मनोज जरांगेंकडून सरकारला वेठीस धरलं जात आहे का?यावर भुजबळ म्हणाले की, “मनोज जरांगे हे अजिबात सरकारला वेठीस धरत नाही. उलट सरकारच वेळकाढूपणा करत आहे. जरांगेंच्या मागण्या ताबोडतोब मान्य करायला हव्यात, मी आतापर्यंत केलेली सर्व भाषणे मागे घेतो, सर्व वक्तव्यं मागे घेतो, असा उपरोधिक टोला लगावला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रस्थापितांनी धसका घेतलेले शिवाजीराव!

सारीपाट / शिवाजी शिर्के वसुबारसेच्या निमित्ताने सारेजण उत्साहात सकाळची आवराआवर करत असताना दूध उत्पादक...

कोल्हेवाडीत थरार! तरुणाने पेटवली कार; भांडण सोडवणे पडले महागात

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- भांडण सोडवण्याचा प्रयत्न एका महिलेला चांगलाच महागात पडला. नगर तालुक्यातील...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भारतीय रिझर्व बँकेने नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना 4 ऑक्टोबर...

शहराच्या मध्यवर्ती भागात कोयता गँगचा कहर; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर हल्ला..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- एका २२ वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना...