spot_img
ब्रेकिंगमी फक्त समाजाचा! आता सुट्टी नाय..? मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

मी फक्त समाजाचा! आता सुट्टी नाय..? मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

spot_img

Manoj Jarange: तुम्ही एसआयटी चौकशी सुरू केली आहे. काय चुकले आमचे? तुमच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चूक आहे. तुमचे राजकीय अस्तित्व धोयात आहे असा हल्लाबोल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केला. फडणवीस यांच्या वागणुकीमुळे समाज मोठ्या प्रमाणात एकत्र आला आहे. त्यांच्यासाठी हे आता जड जाणार आहे असा इशाराच मनोज जरंगे पाटील यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी थोड्या दिवसात मराठ्यांच्या सभा काय असतात, त्या बघाव्यात, असा इशारा जरांगेंनी फडणवीसांना लातूरच्या अहमदपूर येथील संवाद बैठकीत दिला. फडणीसांनी विनाकारण मराठा समाजाबाबत द्वेष व्यक्त केला आहे. राज्यात मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करणे, महिलांवर गुन्हे दाखल करणे सरकारकडून सुरु आहे. सध्या तरी मी राज्यात संवाद बैठका घेत आहे, माझी एसआयटी चौकशी हे फक्त नाटक आहे. सरकारने फक्त मला अटक करून दाखवावे असे जरांगे म्हणाले.

शरद पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, बच्चू कडू, प्रकाश आंबेडकर यांचा माणूस आहे, असे आरोप माझ्यावर सातत्याने होत आहेत. मात्र, मी फक्त समाजाचा आहे. मी कोणाचे ऐकत नसतो. शरद पवार जर आरक्षणाच्या विरोधात बोलले, तर उद्यापासून मी त्यांचाही विरोध करेल, असे जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे हे लातूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. काल (मंगळवार) रात्री लातूरच्या अहमदपूर येथे त्यांनी मराठा आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्यांची संवाद बैठक घेतली आहे. तर आज (बुधवार) लातूरच्या निलंगा, कासार -शिरशी, आणि लातूर शहरात नागझरी ठिकाणी मराठा आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीला ते उपस्थित होते.

मराठा समाज निवडणुकांत करणार भाजपची कोंडी
आरक्षण प्रश्नावर भारतीय जनता पक्षाची कोंडी करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाने केला आहे. त्यासाठी नाशिकमधून अडीचशेहून अधिक कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. हीच स्थिती बर्‍याच मतदार संघात असण्याची शयता आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. याशिवाय सगेसोयरे याबाबतचा अध्यादेश काढण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना वाशी येथे दिले होते. त्याबाबत काहीही कार्यवाही करण्यात आली नाही. उलट मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे सर्व मराठा आरक्षणाचे नेते जरांगे पाटील यांना अडचणीत आणण्याचे डावपेच आहेत. राज्य शासनाच्या या धोरणाविरुद्ध समाजामध्ये आक्रोश आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करतील त्यातून मतदान यंत्र ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक नेण्याचा प्रयत्न असेल असे सांगण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...

आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल! ‘या’ योजनेचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून...