Swargate Rape Case: पुण्यातील स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरणात अटक केलेल्या आरोपी दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी धक्कादायक दावा केला आहे. आरोपी आणि पीडित तरुणीमध्ये पैशांवरून वाद झाला होता, त्यामुळे तिने बलात्काराचा आरोप केल्याचे वकिलांचे म्हणणे आहे.
आरोपीच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि दत्तात्रय गाडे यांची ओळख एक महिन्यापूर्वी स्वारगेट बस डेपोमध्ये झाली होती. गाडेने वकिलांना सांगितले की, मी तिला कुठलीही बळजबरी केली नाही. तिनेच मला बोलावले आणि आम्ही बसमध्ये गेलो. तिने माझ्याकडून साडेसात हजार रुपये घेतले.” तसेच, त्या ठिकाणी तरुणीचा एक एजंटही उपस्थित होता, असेही गाडेने सांगितले.
पिडित तरुणीवर बलात्कार झालाच नाही. दोघांमध्ये जे झालं ते दोघांच्या संमतीने झालं होतं. दत्ता गाडे आणि ती मुलगी एकमेकांना एक महिन्यापासून ओळखतात. त्यांचे कॉल रेकॉर्डस काढले तर समजेल, असंही आरोपींच्या वकिलांनी म्हटलं आहे. दत्ता गाडे हा पळून गेला नाही तर तो आपल्या गावी गेला. गावाला पोलीस छावणीचे स्वरुप आल्याने तो दडून बसला होता, अशी माहिती देखील आरोपीच्या वकिलांनी दिली आहे.
पिडीत तरुणीवर बलात्कार झालाच नाही. दोघांमध्ये जे घडले ते संमतीने झाले, असा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे. तसेच, दत्तात्रय गाडे आणि पीडित तरुणी एकमेकांना एक महिन्यापासून ओळखत होते, त्यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासल्यास सत्य समोर येईल, असेही ते म्हणाले. दत्तात्रय गाडे पळून गेला नव्हता, तर तो आपल्या गावी गेला होता. गावात पोलिस मोठ्या संख्येने आल्याने तो लपून बसला होता, अशी माहिती आरोपीच्या वकिलांनी दिली.