spot_img
महाराष्ट्रमी हवं तर स्टॅम्प पेपरवर लिहून देतो पण हा खेळ आता थांबवा...आ.रोहित...

मी हवं तर स्टॅम्प पेपरवर लिहून देतो पण हा खेळ आता थांबवा…आ.रोहित पवार MIDC वरून काकुळतीला

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : कर्जत-जामखेडमधील एमआयडीचा मुद्दा मागील काही दिवसांत चांगलाच ऐरणीवर आला आहे. यात श्रेयवादाची लढाई चांगलीच रंगली आहे. या एमआयडीसीच्या प्रस्तावित जागेला स्थगिती आल्यानंतर आ. पवार व आ. शिंदे हे एकमकेवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

राजकीय कुरघोडीमुळे या एमआयडीसाला मंजुरी दिली जात नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून केला जात आहे. आता आ. रोहित पवार यांनी आता सोशल मीडिया हँडलवर याबाबत एक पोस्ट लिहीत आपला संताप व्यक्त केला आहे. “तुम्हाला एमआयडीसीचं श्रेयच हवं असेल तर मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की ही एमआयडीसी तुमच्यामुळेच झाली. पण असले रिकामे उद्योग कशाला करता? तुमच्या वैयक्तिक स्वार्थापोटी लाखो युवकांना, गोर गरीब जनतेला, पुढच्या पिढ्यांना कशात अडचणीत आणता?” असा सवाल त्यांनी केला आहे.

आ. रोहित पवारांचा काय हे आरोप
एमआयडीसीबाबत आपली भूमिका मांडताना रोहित पवारांनी लिहिलं आहे की, “एखाद्या भागात उद्योग व्यवसाय आल्याने त्या भागाची होणारी भरभराट मी पाहिली आहे. त्या भागातल्या सर्वसामान्यांचे उंचावणारे जीवनमान मी पाहिले आहे. ज्याप्रमाणे योग्य नियोजन करून बारामती, रांजणगाव, छत्रपती संभाजीनगर यासारख्या अनेक भागात औद्योगिक विकास झाला, भरभराट झाली तोच विकास तीच भरभराट माझ्या भागातही व्हावी,

ही माझी साधी इच्छा एक लोकप्रतिनिधी म्हणून आहे. युवा संघर्ष यात्रेत चालत असताना सुद्धा प्रत्येक भागात त्या-त्या जिल्ह्यात त्या-त्या तालुक्यात एमआयडीसी व्हाव्यात ही युवा वर्गाची मागणी समोर आली. कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी व्हावी यासाठी मी गेल्या तीन वर्षापासून पाठपुरावा करत आहे, लढत आहे. सर्व काही झालं आहे, सर्वेक्षण झालं आहे, सर्व परवानग्या मिळाल्या आहेत, फक्त एक सही तेवढी बाकी आहे. परंतु केवळ राजकीय श्रेयवादातून एमआयडीसी जाणून बुजून रोखली जात आहे,” असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नागेबाबा मल्टीस्टेटच्या कार्याचे केंद्रीय सहकार खात्याने केले कौतुक’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- येथील नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या कार्याचे विशेष कौतुक केंद्रीय सहकार खात्याचे मुख्य...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या जातकांना मिळणार गोड बातमी

मुंबई नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे...

अभिनेत्री नयनतारा झाली सायबर क्राईमची शिकार; पहा नेमक काय घडलं…

नगर सह्याद्री वेब टीम - नयनतारा ही साऊथची सुपरस्टार आहे. तिने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत...

‘पोलिस मुख्यालयातील बाप्पाचे विसर्जन’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- अहमदनगर पोलिसांकडून आजच बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यात आला. गेल्या आठ...