spot_img
महाराष्ट्र' मी देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस ईश्वर...'; महाराष्ट्राच्या CM पदी देवेंद्र फडणवीस,...

‘ मी देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस ईश्वर…’; महाराष्ट्राच्या CM पदी देवेंद्र फडणवीस, ५ डिसेंबरला होणार शपथविधी..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री: –
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचीच वर्णी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय जनता पक्षातील एका ज्येष्ठ नेत्यांनी एका वृत्त वहिनीला दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता आझाद मैदानावर होणार आहे. या संदर्भात सर्व तयारी ही पूर्ण झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही राज्यात अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. सध्या एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. मात्र महायुतीतील चर्चा अद्याप संपलेली नसल्याने सत्ताधारी पक्षांमधील समन्वयावर विरोधकांच्या वतीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. विविध पक्षाचे वेगवेगळे नेते या बाबत दावे करत आहेत. मात्र, यातच आता देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची माहिती विश्वासनीय सुत्रांकडून मिळाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देखील हिरवा कंदिल मिळाला आहे. त्यांच्याच नेतृत्वात भाजपने निवडणूक लढली असून त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.

शपथ घेण्याआधी आमिर खानने दिल्या शुभेच्छा
विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठं यश मिळवल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीतून मुख्यमंत्री कोण होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. याचदरम्यान, एका कार्यक्रमात अभिनेता आमिर खानने देवेंद्र फडणवीस यांना सरकार चालवण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे आमिर खानने शुभेच्छा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बाप्पा गणेशा, जरांगे पाटलांच्या जोडीने तुझंही स्वागत!

आयजी कराळे साहेब, वर्षभरापूर्वी तुमच्या डीजे बंदीला तुमच्याच अधिकाऱ्यांनी फाट्यावर मारले! कोण आवर घालणार...

शहर हादरलं! पोटच्या मुलाने आईला संपवलं, धक्कादायक कारण उजेडात..

Maharashtra Crime News: रएक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शांतीनगर परिसरात मुलानेच स्वतःच्या आईची...

मनोज जरांगेंना हायकोर्टाचा दणका, आरक्षणाबाबत सरकारने केली मोठी घोषणा

जालना | नगर सह्याद्री:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले...

बाप्पाच्या स्वागतासाठी नगरकर सज्ज; मंडळांची तयारी पूर्ण, पहा, फोटो..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सवाचा जल्लोष रंगू लागला आहे. बाप्पाच्या...