spot_img
ब्रेकिंगManoj Jarange Patil: मी लढण्यासाठी खंबीर! पहिल्या खपक्यातच 'त्यांना' पाडणार? जरांगे पाटील...

Manoj Jarange Patil: मी लढण्यासाठी खंबीर! पहिल्या खपक्यातच ‘त्यांना’ पाडणार? जरांगे पाटील यांचे विधानसभा निवडणूकबाबत मोठे वक्तव्य, वाचा सविस्तर..

spot_img

जालना / नगर सह्याद्री
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे मनोज जरांगे पाटील काय भूमीका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र मराठा आरक्षण तसेच सगे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा ८ जून पासून उपोषणाला बसले आहेत.

दरम्यान आज अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनावर ठाम असल्याचं सांगत सरकारवार जोरदार निशाणा साधला आहे.

जरांगे पाटील म्हणाले, सरकारच्या वतीने अजून कुणीही भेटायला आलेलं नाही.काय होतंय, ते बघू या. मराठ्यांच्या मुलांना बीड जिल्ह्यात विनाकारण मारहाण झाली आहे. परळी बंदची हाक, अश्लील स्टेटस तसं करायला नको. कुणाचेही स्टेटस ठेऊ नका. निवडणुकीआधी देखील मी हेच सांगितलं आहे.

पुढे बोलतांना ते म्हणाले, सर्वांनी शेतीची कामे करा. अंतरवालीत येऊ नका, मी लढण्यासाठी खंबीर आहे. सरकारने आम्हाला आरक्षण द्यावं. नाही दिलं तर नाईलाजाने आम्हाला विधानसभा निवडणूक लढवावी लागेल, मराठ्यांना त्रास देणाऱ्या नेत्यांना पहिल्या खपक्यातच समाज पाडेल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...