पुणे | नगर सह्याद्री
लोणावळ्यात आज (७ मार्च) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मावळ तालुका कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्याला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांना थेट इशारा देत मलाही शरद पवार म्हणतात, अशा शब्दात सज्जड दम दिला.
यावेळी त्यांनी मोदी-शहांवरही हल्लाबोल केला. शरद पवार म्हणाले, मला असं समजलं तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं येताय म्हणून तुम्हाला धमकी दिली जात आहे. मी त्यांना सांगू इच्छितो. सुनील शेळके तुम्ही आमदार कोणामुळे झाला, तुझ्या सभेला कोण आलं होतं. पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे. हे लक्षात ठेवा. यापुढं असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही असा थेट इशारा शरद पवार यांनी दिला
शेतकर्यांच्या आत्महत्या हीच मोदींची गॅरंटी
पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही. जवाहरलाल नेहरूंबद्दल काहीही बोललं जातंय. गांधी, सुभाषबाबू, जवाहरलाल नेहरू यांचं योगदान हे देश स्वतंत्र करण्यासाठी होतं. अशा लोकांची नोंद जाणकारांनी घ्यायचे असते. आज देशाचे पंतप्रधान प्रत्येक दिवशी पूर्ण पान जाहिरात देतायेत. त्यात मोदींची गॅरंटी देतायेत, पण ही कोणाच्या पैशाने जाहिराती दिली जातेय. जनतेच्या पैशाने हे गॅरंटी देतायेत अशी टीका शरद पवार यांनी केली. आज हे सांगतात, शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट वाढवतो. गेली दहा वर्षे मोदी सत्तेत आहेत, उत्पन्न वाढलं का? उलट शेतकर्यांच्या आत्महत्या वाढल्या. शेतकर्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणली, हीच मोदींनी गॅरंटी दिली अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली.
कमळावर लढू पण तिकीट द्या, बारा खासदारांचे शिंदेंना साकडे
लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या अनेक खासदारांचे तिकीट भाजपच्या नेत्यांकडून कापले जाण्याची दाट शयता आहे. यामुळे उमेदवारीचा शब्दफ घेऊन गद्दारीचा शिक्का मारून घेतलेल्या अनेकांच्या पोटात गोळा आला आहे. काहीही करा; पण तिकीट फिसफ कराफ असे साकडेच बारा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले आहे. जिंकणार्यालाच उमेदवारीफ असा निर्णय भाजपने घेतल्याने मुख्यमंत्र्यांचीही अडचण झाली आहे. एका खासदाराला उमेदवारी मिळणार नाही, याची खात्री आहे. उर्वरित बारा खासदार दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांची एकत्रित भेट घेणार आहेत. धनुष्यबाण शय नसेल, तर कमळ चिन्हावर लढण्याचीही आपली तयारी आहे; पण तिकीट द्या, असा आग्रह ते धरणार आहेत अशी माहिती समजली आहे.