spot_img
ब्रेकिंगAhmednagar: हुडहुडी वाढली! नगरचा पारा १० अंशावर, हवामान खाते म्हणाले, दोन दिवसात..

Ahmednagar: हुडहुडी वाढली! नगरचा पारा १० अंशावर, हवामान खाते म्हणाले, दोन दिवसात..

spot_img

अहमदनगर| नगर सह्याद्री-
जिल्ह्यात थंडीमध्ये मोठी वाढ झाली आहे. अहमदनगरसह नाशिक, पुणे येथे सर्वात कमी तापमान नोंदवले गेले आहे. पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नगरचा पारा ११ ते १२ अंशावर आला असून आणखी दोन दिवसात तो १० ते ९ अंशापर्यंत खाली येण्याची शयता हवामान विभागाने वर्वतली आहे.

नगरमधील वातावरण चांगलेच थंड झाले आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर नगरचा पारा १० ते ११ अंशावर आला होता. बुधवारी व गुरुवारीही सकाळपासून गार वारा सुरू आहे. बुधवारी नाशिक, पुणे, जळगावसह नगरचे तापमान सर्वात थंड होते. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढल्याने रब्बी पिकांना चांगला फायदा होत आहे.

जानेवारी महिन्यात पडलेल्या थंडीमुळे गहू, हरभर्‍याच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, जानेवारी अखेरपर्यंत थंडीचा कडाका कायम राहील, असे म्हटले जात आहे. बुधवारी नाशिक (९ अंश), अहमदनगर (९.३ अंश), पुणे (९.७ अंश), जळगाव (९.९ अंश), छत्रपती संभाजीनगर (१०.२ अंश) असे तापमान नोंदवले गेले. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर दिवसाच्या तापमानात हळूहळू वाढ होईल. १५ फेब्रुवारीनंतर रात्रीचा पारा १४ अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
तलाठी परीक्षेची निवड यादी जाहीर

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अक्षय कर्डिलेंना जिल्हा बँकेत तोच न्याय मिळणार का?

अहिल्यानगर / नगर सह्याद्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनानंतर जिल्ह्याच्या राजकारणासह जिल्हा बँकेत...

..आता दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे, अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाच्याविरोधात आता एल्गार पुकारला आहे. विरोधकांनी रस्त्यावर उतरून...

संतापजनक! रुग्णवाहिकेत आशा वर्करसोबत भयंकर घडलं, रात्री परतताना चालकाने केलं असं काही..

Maharashtra Crime News : महिलांचा लैंगिक छळ, अत्याचाराच्या घटना अजूनही थांबत नाहीत. अशात सहकाऱ्याकडूनच...

हवामान खात्याची महत्वाची अपडेट, काय दिला इशारा?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून...