spot_img
देशआमदारांना दरमहा किती पगार मिळतो? पेन्शन किती व कशा पद्धतीने दिली जाते?...

आमदारांना दरमहा किती पगार मिळतो? पेन्शन किती व कशा पद्धतीने दिली जाते? पाहून डोळे विस्फारतील

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : आमदारांना किती पगार असतो? किती पेन्शन मिळते? पेन्शन कशी दिली जाते? त्यांना किती भत्ता मिळतो, सुविधा मिळतात? असे अनेक प्रश्न नागरिकांना पडत असतात. याठिकाणी आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात –

आमदारांना किती पगार मिळतो?
विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहाच्या सर्व सदस्यांना म्हणजेच प्रत्येक आमदाराला नियमानुसार पगार, भत्ता, सुविधा, सवलती देणं ठरलेलं आहे. यासंदर्भात विधिमंडळातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विधिमंडळाच्या सदस्यांना म्हणजेच आमदारांना दर महिन्याला साधारण 1 लाख 82 हजार, 200 रुपये पगार मिळतो. इतर सुविधा, भत्ते मिळून महिन्याला साधारण 2 लाख 41 हजार 174 रुपये एका आमदाराला मिळतात. आमदारांच्या पीएच्या पगारासाठी 25 हजार रुपये मंजूर झालेले आहेत.

आमदाराला खालील भत्ते मिळतात –
टेलिफोनसाठी – 8 हजार
स्टेशनरीसाठी – 10 हजार
संगणकसाठी – 10 हजार

प्रवासासाठीही व्यवस्था
आमदाराला राज्यांतर्गत प्रवासासाठी दर वर्षाला 15 हजार रुपये तर महाराष्ट्राबाहेर जायचे असल्यास त्यासाठी स्वतंत्र 15 हजार रुपये मिळतात. आमदार विमानतळाहून राज्यांतर्गत 32 वेळा आणि देशांतर्गत 8 वेळा प्रवास करू शकतात.

निवृत्ती वेतन किती मिळते?
माजी आमदाराला प्रति महिना 50 हजार रुपये निवृत्तीवेतन मिलते. एकाहून अधिक टर्म जर तो आमदार असेल तर 50 हजार रुपयांमध्ये प्रत्येक टर्मसाठी 2 हजार रुपये वाढत जातात. म्हणजे एखादा आमदार एक वेळ आमदार राहिला असल्यास त्या माजी आमदाराला 50 हजार रुपये निवृत्ती वेतन मिळेल व जर तो दोन टर्म आमदार असेल तर त्याला 52 हजार रुपये निवृत्ती वेतन मिळेल. त्याचप्रमाणे जर आमदाराचे निधन झाले तर त्याच्या पती/पत्नीस 40 हजार रुपये निवृत्तीवेतन म्हणून मिळतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...