spot_img
अहमदनगरव्यावसायिकावर हनीट्रॅप; पतीच्या मदतीने साडे सत्तावीस लाख उकळले

व्यावसायिकावर हनीट्रॅप; पतीच्या मदतीने साडे सत्तावीस लाख उकळले

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
केडगाव उपनगरात राहणाऱ्या महिलेने तिच्या पतीच्या मदतीने पुण्यातील उरळी कांचन येथील रहिवासी सोनार व्यवसायिकाला हनीट्रॅप‌’ च्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून वेळोवेळी 27 लाख 56 हजार 162 रूपये घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधीत सोनाराने रविवारी (6 एप्रिल) दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शितल कैलास काळे व तिचा पती कैलास अंबादास काळे (दोघे रा. दुधसागर सोसायटी, गल्ली नंबर तीन, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सोनार व्यावसायिकाने फिर्यादीत म्हटले आहे की, 2012 साली व्यवसायाच्या ओळखीमुळे शितल काळे हिच्याशी संपर्क आला आणि ओळख पुढे वाढत गेली. वेळोवेळी फोनवरून आणि प्रत्यक्ष भेटीव्दारे दोघांत प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. पुढे शितल हिने भावनिक ओलावा निर्माण करून शारिरीक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर हे संबंध गुप्त व्हिडीओ व फोटोंच्या आधारे ब्लॅकमेलिंगसाठी वापरण्यात आले.

दरम्यान, याच फोटो पान आणि व्हिडीओंच्या आधारे धमकावून वेळोवेळी पैशांची मागणी करण्यात आली. पार्लर उघडण्यासाठी एक लाख रूपयांची मागणी करून सुमारे 98 हजार 812 रूपयांचे साहित्य, रोख रक्कम दिली. तसेच दोन वेळा वेगवेगळ्या मोपेड गाड्याही घेतल्या. 2024 साली फिर्यादी यांनी स्वतःच्या पत्नीच्या नावावरील घर विकून 18 लाख रूपये मिळवले. यापैकी बहुतांश रक्कम शितल हिला दिली असून, त्या पैशातून तिने केडगाव उपनगरातील भुषणनगर भागात 43 लाखांचे घर खरेदी केले.

त्या घरावरील कर्जाचे हप्तेही फिर्यादी यांनी भरण्याचे कबूल केले आहे. मार्च 2025 मध्ये हप्ता न भरल्यावर शितल हिने पुन्हा धमकावणे सुरू केले. आजपर्यंत फिर्यादी यांनी ऑनलाईन पध्दतीने पाच लाख 47 हजार 814 रूपये व रोख स्वरूपात 22 लाख आठ हजार 348 रूपये, तसेच दोन मोपेड गाड्या असे एकूण अंदाजे 27 लाख 56 हजार 162 रूपये शितल व तिच्या नवऱ्याला दिल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे.दरम्यान, फिर्यादीने आत्महत्येचा विचार केला होता. मात्र त्यांच्या पत्नीने धीर देत घर विक्रीचा सल्ला दिला आणि हा सर्व प्रकार तिला सांगण्यात आला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जागरण-गोंधळात केले जेवण; ७१ जणांना विषबाधा; अनेकांना ताप, खोकला, उलटी अन् जुलाब…

धाराशिव / नगर सह्याद्री - जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमात जेवण केल्यानंतर ७१ जणांना विषबाधा झाली. अनेकांना...

अजित पवारांच्या स्वागतासाठी रोहित पवारांची बॅनरबाजी, नगरमध्ये नेमकं चाललंय काय?

कर्जत / नगर सह्याद्री : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज जामखेड दौऱ्यावर येत आहेत. अजित...

जनता दरबारात तक्रारींचा पाऊस; आमदार काशिनाथ दाते आक्रमक, म्हणाले…

आमदार काशीनाथ दाते | तक्रारींचा पाऊस | तातडीने निराकारण करण्याचे आश्वासन पारनेर | नगर सह्याद्री:- पारनेर...

सावधान! जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट, कुठे काय परिस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान...