spot_img
आरोग्यHomemade Scrub: सुंदर त्वचेचं घरगुती रहस्य! 'अशा' पद्धतीने बनवा ‘होममेड स्क्रब’

Homemade Scrub: सुंदर त्वचेचं घरगुती रहस्य! ‘अशा’ पद्धतीने बनवा ‘होममेड स्क्रब’

spot_img

नगर सहयाद्री टीम-
रोजच्या दगदगीच्या आयुष्यात स्वतःच्या त्वचेची काळजी घेणं अगदी गरजेचं होऊन बसतं. दिवाळी बरोबर लग्नसराईला लवकरच सुरूवात होत आहे. त्यामुळे विवाहेच्छुकांच्या प्रयत्नांना वेग आला असणार आहे. यात आकर्षक पेहरावाबरोबर सुंदर दिसणेही गरजेचं ठरतं. त्यादृष्टीने सौंदर्यप्रसाधनांच्या वापरावर भर दिला जातो. अशा वेळी घरच्या घरी देखील तुम्ही ‘होममेड स्क्रब’ च्या सहाय्याने तुम्ही सौंदर्य उजळवू शकता. चला तर आपला खिसा आणि त्वचा दोन्हीला आवडतील अशा फेसपॅक बाबत जाणुन घेवुया…

ऑरेंज स्क्रब
हनी अँड ऑरेंज स्क्रब तयार करण्यासाठी संत्र्याच्या सुकवलेल्या सालीची दोन टेबलस्पून पावडर आणि तितकेच ओट्‌स घ्या. यात मध घाला. जाडसर मिश्रण तयार करा. चेहऱ्यावर लावा. पाच मिनिटांनी धुवून टाका.

टोमॅटो स्क्रब
ओट्‌स आणि टोमॅटो स्क्रब तयार करण्यासाठी थोडे ओट्‌स घ्या. पिठीसाखर आणि पिकलेले टोमॅटो घ्या. टोमॅटोचे मोठे तुकडे करा. एका तुकड्यात ओट्‌स आणि साखर भरा. हा टोमॅटो चेहऱ्यावर घासा. पाच ते सात मिनिटांनी चेहरा धुवा.

बनाना स्क्रब
बनाना स्क्रब तयार करण्यासाठी दोन पिकलेली केळी कुस्करून घ्या. त्यात साखर घाला. यात चमचाभर मध घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि धुवून टाका.

लेमन स्क्रब
हातापायांसाठी तुम्ही लेमन स्क्रब तयार करू शकता. हे स्क्रब चेहऱ्याला लाऊ नका. हे स्क्रब तयार करण्यासाठी अर्धं लिंबू घ्या. हे लिंबू साखरेत बुडवा आणि हातापायांवरून फिरवा. पाच ते सात मिनिटांनी गरम पाण्याने धुवून टाका.

पपईचं स्क्रब
पपईचं स्क्रब तयार करण्यासाठी अर्धा कप पिकलेली पपई घ्या. पपई कुस्करून त्यात दूध घाला. हळू-हळू सर्व मिश्रण ढवळा आणि त्याची पेस्ट करा. मग ती पेस्ट चेहऱ्यावर लावा. दहा ते पंधरा मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. आणि मग तुमच्या चेहऱ्यावर आलेलं तेज काही आगळंच असेल.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षणाचा GR फाडला, OBC नेते आक्रमक, आता राज्यव्यापी आंदोलन

पुणे / नगर सह्याद्री - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानावर...

संयमाने परिस्थिती हाताळत, अभूतपूर्व पेचातून मार्ग काढत कसोटीस उतरलेले संयमी नेतृत्व विखे पाटील खरेखुरे वास्तववादी संकटमोचक!

सारिपाट / शिवाजी शिर्के काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या राळेगणसिद्धी येथील उपोषणात गिरीष...

मावा अड्ड्यावर छापा; एलसीबीची मोठी कारवाई

अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोनई पोलिस ठाण्याच्या हद्दीत मावा अड्डयावर छापा...

जादा परताव्याचे आमिष; १.६० कोटींची फसवणूक, १५ आरोपी, पोलिसांनी केले असे…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरमध्ये इनफिनाईट बिकन इंडिया प्रा. लि. आणि ट्रेड्स इन्व्हेस्टमेंट प्रा. लि....