spot_img
महाराष्ट्र...म्हणून पवार कुटुंबीयात दुरावा!! बारामतीत 'ते' पत्र व्हायरल

…म्हणून पवार कुटुंबीयात दुरावा!! बारामतीत ‘ते’ पत्र व्हायरल

spot_img

बारामती | नगर सह्याद्री
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर सर्वाधिक गोंधळाची परिस्थिती बारामतीमध्ये आहे. थोरल्या साहेबांना साथ द्यावी की, अजित पवारांबरोबर राहावं, अशा संभ्रमात लोक दिसत आहेत. आता बारामतीमध्ये एक निनावी पत्र व्हायरल झालं आहे. बारामतीकरांची भूमिका या नावाने हे पत्र व्हायरल झाले आहे. राजेंद्र पवारांची क्षमता असून देखील अजित पवारांना पुढे केले तसेच तिसर्‍या पिढीत राजकारणात येण्याचा अधिकार रोहित पवार यांना होता, ते राजकारणात आल्यानंतर जळफळाट सुरू झाला, असा उल्लेख या पत्रात करण्यात आलेला आहे.

रोहितला एक मंच देऊ शकलो : राजेंद्र पवार
जेव्हा एखाद्या व्यक्तीवर अन्याय होतो, तेव्हा निनावी पत्रातून भावना व्यक्त केल्या जातात. या पत्राच्या माध्यमातून कुणीतरी खदखद व्यक्त केली आहे. मी आणि अजित पवार एकाच वयाचे आहोत. अजित पवार १९८७ साली राजकारणात आले आणि तिथून ते पुढे पुढे जाऊ लागले. शरद पवार यांचा पुतण्या असल्यामुळे कदाचित मीही राजकारणात येईल, असे त्यावेळी लोकांना वाटत होते. पण शरद पवारांनी निर्देश दिल्यानुसार मी शेती, व्यवसाय आणि सामाजिक काम करत राहिलो. त्यातूनच मी रोहित पवारला २१ व्या वर्षी एक मंच तयार करून देऊ शकलो, अशी प्रतिक्रिया राजेंद्र पवार यांनी दिली.

पत्रामध्ये नेमकं काय आहे?
पवारांच्या घरात शेतकरी कामगार पक्षाचं राजकारण होतं. शरद पवारांचा ओढा काँग्रेसकडे होता. याच पक्षात ते पुढे पुढे जात राहिले आणि आप्पासाहेबांनी शेतीकडे मोर्चा वळविला. पुढची पिढी जेंव्हा तयार होत होती. तेव्हा स्व. अनंतरावांचा मुलगा अजित आणि आप्पासाहेबांचा मुलगा राजेंद्र यांच्यापैकी कोणाला राजकारणात पाठवायचे याबाबत विचार होत होता. तेव्हा दो्ही भावांनी अनंतरावांच्या मुलासाठी काहीतरी केलं पाहीजे, म्हणून राजेंद्र पवारांची क्षमता असूनदेखील अजित पवारांना पुढे केले.दोघांनीही त्यांना वेळोवेळी सांभाळूनदेखील घेतले. तेव्हा राजेंद्र पवारांनी बंड केलं नाही. पुढचा इतिहास माहितच आहे. पण तिसर्‍या पिढीत जेव्हा पार्थ की रोहित अशी निवड करायची ठरली. तेव्हा आप्पासाहेबांचा थेट वारसदार म्हणून रोहितची निवड करुन अप्रत्यक्षपणे राजेंद्र पवारांना न्याय देण्यात आला. तिथपासून खरा जळफळाट सुरू झाला होता. सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धाराशीवच्या काड्या पेटल्या आणि तोफांना बत्त्या लागल्या. म्हणूनच सामान्य बारामतीकरांची हीच भूमिका आहे की, वाजवा तुतारी गाडा गद्दारी

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रावर दुहेरी संकट! 3 जिल्ह्यांना उष्णतेचा इशारा तर ‘या’ सात जिल्ह्यांत अवकाळी पाऊस बरसणार

Maharashtra Weather: राज्यात हवामानाने अचानक कलाटणी घेतली असून काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट तर काही...

अहिल्यानगर: महिला वनरक्षकावर हल्ला; फॉरेस्ट परिसरात काय घडलं?, धक्कादायक कारण समोर…

Crime News : देहरे (ता. अहिल्यानगर) येथील वन (फॉरेस्ट) विभागाच्या परीक्षेत्रातील सर्वे नंबर 171...

आजचे राशी भविष्य! तुमच्या नशिबात काय?, वाचा सविस्तर

मुंबई। नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य आजचा दिवस तुमच्यासाठी सक्रिय ऊर्जेचा उभारी देणारा नाही आणि तुम्ही...

भाविकांसाठी खुशखबर.! चार धाम यात्रेबाबत मोठी अपडेट

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : ३० एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चार धाम यात्रेची तयारी जोरात सुरू...