मुंबई। नगर सहयाद्री:-
राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी रिमझिम आणि हलका पाऊस पडत आहे. पण आता पाऊस चांगला जोर धरणार असून राज्यभरात मान्सून सक्रिय होणार आहे. त्यातच हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यभरात मान्सून सक्रिय होणार असून पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर वाढेल. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच सोमवार, मंगळवार आणि बुधवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी देण्यात आला आहे. तर मुंबईत तीन दिवस अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.