spot_img
आरोग्यHealth Tips : डायबेटिज असणाऱ्यांनी प्यावेत 'हे' ४ नैसर्गिक ड्रिंक्स ! होईल...

Health Tips : डायबेटिज असणाऱ्यांनी प्यावेत ‘हे’ ४ नैसर्गिक ड्रिंक्स ! होईल फायदा

spot_img

नगर सह्याद्री टीम ; डायबिटीज ज्यांना असतो त्यांच्यावर अनेकांना खाण्यापिण्याचे बंधने असतात. यावेळी अनेकदा शून्य-कॅलरी किंवा कमी-कॅलरी पेये पिण्याचा सल्ला दिला जातो. रक्तातील साखरेची वाढ रोखणे हा त्याचा मुख्य उद्देश असतो. तज्ञ सांगतात की, मधुमेही रुग्ण त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काही नैसर्गिक पेये पिऊ शकतात. ती कोणती आहेत याबद्दल जाणून घेऊयात –

1. पाणी
जेव्हा हायड्रेशनचा विचार केला जातो, तेव्हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी पाणी हा सर्वोत्तम पर्याय आहे, कारण ते तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू देत नाही. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील अतिरिक्त ग्लुकोज लघवीद्वारे काढून टाकण्यास मदत होते. एका प्रौढ पुरुषाने दिवसातून सुमारे 3.08 लिटर पाणी प्यावे आणि महिलांनी दिवसातून सुमारे 2.13 लिटर पाणी प्यावे.

2. ग्रीन टी
अनेक संशोधकांमध्ये हे सिद्ध झाले आहे की ग्रीन टीचा तुमच्या सामान्य आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. ग्रीन टीचे दररोज सेवन केल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो आणि ज्यांना मधुमेह आहे त्यांचे आरोग्य सुधारते.

3. गोड नसणारी कॉफी
कॉफी पिल्याने साखरेचे चयापचय सुधारते आणि टाइप २ मधुमेह होण्याचा धोका कमी होण्यासही मदत होऊ शकते. त्यात थोडीशीही साखर न घालता ती पिल्यास नक्कीच फायदा होतो असे तज्ज्ञ म्हणतात.

4. लिंबू पाणी
लिंबूपाणी हे एक नैसर्गिक पेय आहे जे घरी सहज तयार केले जाऊ शकते, तथापि, लक्षात ठेवा की त्यात साखरेचे प्रमाण शून्य असावे

टीप : वरील माहिती ज्ञानावर आधारित आहे. वैद्यकीय सल्ला घ्यावा

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कान्हूरपठारकरांनी गावासह शाळाही ठेवली बंद

शेकडो पालकांसह ग्रामस्थांचा आक्रोश | ‌‘रयत‌’ च्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती | विद्याथनींमध्ये घबराटीचे वातावरण ‌‘रयत‌’ची...

लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं, लाखो महिला अपात्र, पहा कारण

मुंबई / नगर सह्याद्री : लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होणार असल्याचे...

पैसे वसुलीस नेमलेल्यांनीच परदेशींचा काढला काटा!

10 कोंटींची खंडणी मिळत नसल्याने आवळला गळा | मृतदेह नालीत फेकला अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर...

उन्हापासून दिलासा मिळणार, पाऊस हजेरी लावणार! जिल्ह्यात कसं असेल आजचं हवामान..

Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा तडाखा कायम असतानाच काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे....